spot_img
spot_img

Latest Posts

राज्यातील दहावीचा पुरवणी परीक्षेचा निकाल जाहीर; राज्याचा निकाल २९.८६, लातूरच्या विद्यार्थ्यांनी मारली बाजी…

राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावीच्या पुरवणी (Supplementary) परीक्षेचा निकाल (SSC Result) जाहीर झाला आहे.

राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावीच्या पुरवणी (Supplementary) परीक्षेचा निकाल (SSC Result) जाहीर झाला आहे. राज्याचा निकाल २९.८६ टक्के लागला आहे. निकालात ५१.४७ टक्क्यांसह लातूर (Latur) विभाग पहिल्या स्थानावर आहे. तर सर्वात कमी निकाल मुंबई (Mumbai) विभागाचा लागला आहे. महाराष्ट्र शिक्षण मंडळाने परिपत्रकाद्वारे दहावीचा निकाल आणि विभागवार टक्केवारी जाहीर केली. दहावीच्या निकालात लातूर विभागाने बाजी मारली आहे. तर त्याखालोखाल अमरावती, नागपूर, नाशिक, औरंगाबाद, कोल्हापूर, पुणे आणि मुंबई विभागाने कामगिरी केली आहे. लातूर विभागाचा सर्वाधिक ५१.४७ टक्के निकाल लागला आहे. तर सर्वात कमी १५.७५ टक्के निकाल मुंबई विभागाचा लागला आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत मार्च २०२३ मध्ये घेण्यात येणारी दहावीची लेखी परीक्षा १८ जुलै ते ०१ ऑगस्ट या कालावधीत पार पडली. यंदा दहावीच्या परीक्षेला ४९ हजार ३७७ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. परंतु मागील तीन वर्षाच्या तुलनेत यंदाची निकालाची आकडेवारी घसरली आहे. निकालासंदर्भात काही आक्षेप असेल किंवा गुणपडताळणीसाठी अर्ज करायचे असेल तर अर्ज करण्याची मुदत २९ ऑगस्ट ते ०७ सप्टेंबरपर्यंत करता येणार आहे. ऑनलाईन अर्ज करणे आवश्यक आहे. गुणपडताळणीसाठी प्रति विषय रु.५०/- शुल्क ऑनलाईन पद्धतीने मंडळाकडे जमा करावे लागेल.

दहावीच्या निकाल जाहीर झाला आहे. त्यात अनेक विद्यार्थ्यांना निकालाबाबत अनेक अडचणी किंवा आक्षेप असल्यास तुम्हाला अर्ज करावा लागणार आहे. ऑनलाईन निकालानंतर गुणपडताळणीसाठी, उत्तरपत्रिका प्रत मिळवण्यासाठी, पुनर्मूल्यांकन यासाठी संबंधित विभागीय मंडळाकडे ऑनलाईन पद्धतीने मंडळाच्या अधिकृत वेबसाईटवर verification.mh-ssc.ac.in अर्ज करावा लागणार आहे. हा अर्ज करताना सगळी माहिती, अटी शर्ती आणि सुचना वेबसाईटवर देण्यात आल्या आहेत. या प्रक्रियेसाठी ऑनलाईनच पैसे भरावे लागणार आहेत. यासाठी आवश्यक शुल्क ऑनलाईन पद्धतीने (Debit Card/Credit Card/UPI/Net Banking) भरता येईल.

विभागांचा निकाल :

  • लातूर – ५१.४७ टक्के
  • अमरावती- ४३.३७ टक्के
  • नागपूर – ४१.९० टक्के
  • नाशिक – ४१.९० टक्के
  • औरंगाबाद – ३७.२५ टक्के
  • कोल्हापूर – २९.१८ टक्के
  • पुणे – २२.२२ टक्के
  • मुंबई – १५.७५ टक्के

हे ही वाचा: 

ठाण्यात शरद पवार गट आणि अजित पवार गटांमध्ये झुंज, शरद पवार गटाने भुजबळांचा तर अजित पवार गटाने आव्हाडांचा पुतळा…

Jio AirFibre बाबत मुकेश अंबानी यांची मोठी घोषणा, ‘या’ दिवशी होणार लॉन्च…

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss