इंद्रायणी नदी फेसाळल्याने महायुती सरकारने इंद्रायणी नदी प्रदूषण मुक्त करण्याच आश्वासन दिलं होतं. त्यानिमित्ताने राज्याचे मुख्यंमत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज ३ जानेवारीला आळंदी येथे भेट दिली. त्यावेळी मुख्यंमत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मला अतिशय आनंद आहे की पाडुरंगाच्या आशीर्वादाने एक मोठा विजय आम्हाला प्राप्त झाला आहे. आज आळंदीला येण्याची, माऊलींचा आशीर्वाद घेण्याची संधी मिळाली, प्रत्येकासाठी हा क्षण सुखाचा असतो तो मी आज अनुभवला. वारकरी विचारानेच आपला महाराष्ट्र सातत्याने पुढे जात आहे, याच विचाराची आठवण सतत होत राहावी यासाठी आज इथे आलो.
पुढे ते म्हणाले की, “इंद्रायणीच्या स्वच्छतेचं काम सुरु आहे, हे एका दिवसाचे काम नाही. सर्व गाव, शहराताली उद्योगांचे पाणी हे इंद्रायणी मध्ये जाते ते साफ करुन शुद्ध पाणी नदीत सोडायचे आहे, त्याचे काम सुरु केले आहे. वेगवेगळी गावे, ग्रामपंचायत, नगरपंचायतींना निधी उपलब्ध करुन देत आहोत, असे देखील सांगितले आहे.
इंद्रायणी नदी पुन्हा एकदा फेसाळली आहे. गेल्या आठवड्यामध्येच इंद्रायणी नदी फेसाळल्याचे चित्र पाहायला मिळालं होतं. आज राज्याचे मुख्यंमत्री देवेंद्र फडणवीस हे आळंदी दौऱ्यावर आहेत. त्याआधीच इंद्रायणी नदीच्या प्रदूषणाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. महायुतीचे माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आळंदीमध्येच एका कार्यक्रमादरम्यान इंद्रायणी नदी प्रदूषण मुक्त करण्याचा शब्द दिला होता, तसं जाहीररीत्या आश्वासन दिलं होतं. परंतु हे आश्वासन हवेत विरलं आहे.
हे ही वाचा:
मंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतला पाहिजे, काँग्रेसच्या खासदार Praniti Shinde यांची मागणी
बिझनेस करा, खोट बोलून माझं नाव वापरून बिझनेस करू नका”, कोकण हार्टेड गर्ल संतापली