spot_img
Sunday, March 23, 2025

Latest Posts

‘भांडेवाडीतील कचरा प्रक्रिया प्रकल्पाला गती द्या’ CM Devendra Fadnavis यांचे निर्देश

भांडेवाडी डम्पिंग यार्ड येथे कचरा प्रक्रियेला गती देण्यात यावी आणि प्रक्रियेची क्षमता वाढवून समाधानकारक प्रगती दर्शवावी, असे स्पष्ट निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुसबिडी कंपनी आणि नागपूर महानगरपालिकेला दिले.

भांडेवाडी डम्पिंग यार्ड येथे कचरा प्रक्रियेला गती देण्यात यावी आणि प्रक्रियेची क्षमता वाढवून समाधानकारक प्रगती दर्शवावी, असे स्पष्ट निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुसबिडी कंपनी आणि नागपूर महानगरपालिकेला दिले.

मुख्यमंत्री यांच्या ‘रामगिरी’ या शासकीय निवास्थानी आयोजित बैठकीत मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी, अतिरिक्त आयुक्त श्रीमती आंचल गोयल आणि सुसबिडी कंपनीचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

नागपूर महानगरपालिकेद्वारे भांडेवाडी येथील ३९ एकर जागा सुसबिडी (सस्टेनेबल बिझनेस डेव्हलपमेंट (SusBDe) कंपनीला कचरा प्रक्रिया प्रकल्पाकरिता देण्यात आली आहे. आता कंपनीद्वारे प्रायोगिक तत्वावर बायोगॅस प्रकल्प उभारण्यात आला आहे, अशी माहिती मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिली.

नजीकच्या काळात पूर्ण क्षमतेने कचऱ्यावर प्रक्रिया करण्यात येईल, असे सुसबीडी कंपनी चे प्रोजेक्ट मॅनेजर नितीन पटवर्धन यांनी सांगितले.

याप्रसंगी उपायुक्त विजय देशमुख, अधीक्षक अभियंता डॉ. श्वेता बॅनर्जी, कार्यकारी अभियंता राजेश दुफारे, माहिती तंत्रज्ञान अधिकारी स्वप्नील लोखंडे, सुसबिडी च्या श्रीमती वृंदा ठाकुर, वित्त संचालक विनोद टंडन, सल्लागार राजेंद्र जगताप आदी उपस्थित होते.

हे ही वाचा :

Latest Posts

Don't Miss