Friday, December 1, 2023

Latest Posts

CM EKNATH SHINDE: ६ डिसेंबरला सार्वजनिक सुट्टी देण्याची मागणी

भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर (DR B.R. AMBEDKAR) यांचा महापरिनिर्वाण दिन ६ डिसेंबर (6 DECEMBER) रोजी मुंबईतील चैत्यभूमी (MUMBAI CHAITYABHUMI) याठिकाणी केला जातो. यादिवशी प्रत्येक वर्षी लाखोंच्या संख्येने अनुयायी चैत्यभूमीवर अभिवादन करण्यासाठी येत असतात. यावर्षी सुद्धा चैत्यभूमीवर मोठ्या प्रमाणात गर्दी होण्याची शक्यता आहे. या अनुषंगाने मुंबईत सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्याची मागणी करण्यात येत आहे. महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्ताने सर्व अनुयायांना चैत्यभूमीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करणे शकय व्हावे, यासाठी मुंबईत येतंय ६ डिसेंबरला सार्वजनिक सुट्टी जाहीर करावी, अशी मागणी मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड (VARSHA GAIKWAD) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM EKNATH SHINDE) यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमी येथे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी महाराष्ट्रातूनच नव्हे तर देश-विदेशातून मोठ्या संख्येने भीम अनुयायी दाखल होत असतात. मात्र, यादिवशी सर्व कार्यालये सुरु असल्यामुळे अनेक अनुयायांना महामानवाला अभिवादन करणे शक्य होत नाही. राज्यातील अनेक संघटना याचा पार्श्वभूमीवर बऱ्याच वर्षांपासून सुट्टी मिळावी, अशी मागणी करत आहेत. त्यात ६ डिसेंबर महापरिनिर्वाण दिनी समन्वय समितीने मुबंईत स्थानिक सुट्टी जाहीर करण्यात यावी, याबाबत शासनाकडे शिफारस केली आहे, अशी माहिती वर्षा गायकवाड यांनी दिली आहे.

हे ही वाचा : 

 नागराज मंजुळेंचा आगामी सिनेमा ‘फ्रेम’, पत्रकारांच्या जगण्यावर भाष्य करणारा सिनेमा

एका माशानं रातोरात बनवलं करोडपती

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss