पुण्याच्या स्वारगेट परिसरामध्ये बस स्थानकामध्ये एका वर्षीय तरुणीवर शिवशाही बसमध्ये बलात्कार केल्याचा धक्कादायक घटना घडली होती. आरोपी दत्तात्रय गाडे याला अटक करण्यात आली आहे. आता या प्रकरणातील आरोपींच्या वकिलांनी पिडीतेबाबत केलेल्या वक्तव्यानंतर आणि दाव्यानंतर मोठी खळबळ उडाली होती. या प्रकरणी संभ्रम निर्माण झाला होता.या प्रकरणाच्या सुनावणीच्या दरम्यान 7500 रुपयांचा कुठलाही युक्तिवाद झालेला नव्हता. तरीही सुनावणीनंतर न्यायालयाबाहेर माध्यमांशी बोलताना एका वकिलाने ‘आरोपीने पीडित तरुणीला साडेसात हजार रुपये दिले होते, असं वक्तव्य केलं, वकिलाच्या या वक्तव्याने प्रकरणाला वेगळं वळण मिळालं आणि अनेक चर्चा होऊ लागल्या. मात्र, हा युक्तिवाद न्यायालयात केलाच नसल्याचं उघड झालं आहे. यावर वकिलांनी सारवासारव केला आहे.
वक्तव्य करणाऱ्या वकिल पोटेंनी केली सारवासारव
माध्यमांसमोर खोटी माहिती देऊन पीडित तरूणीच्या बाजूने असलेली सहानुभूती कमी करण्याचा प्रयत्न या वकिलाने केला होता, ही बाब आता समोर आल्याने अनेकांनी संताप व्यक्त केला आहे. पोलिसांनीही पीडितेबद्दल चुकीची माहिती पसरवली असल्याचे बोलले जात आहे. काल सुनावणीनंतर वकिल पोटे यांनी माध्यमांशी बोलताना, ‘न्यायालयासमोर 7 हजार 500 रुपयांचा कुठलाही युक्तिवाद झाला नसल्याची कबुली दिली. कोर्टासमोर युक्तिवाद संपल्यावर आरोपी गाडे याने ही माहिती आम्हाला दिली होती आणि त्यावरून आम्ही माध्यमांशी बोललो, अशी सारवासारव गाडेचे वकील पोटे यांनी केली आहे.
वकिलाने केलेल्या वक्तव्यानंतर पिडितेला मानसिक त्रास
आरोपीच्या वकिलाने पीडितेच्या बाबत वक्तव्ये केल्याने सोशल मीडियावरून पीडितेवर मानसिक अत्याचार झाला आहे. याचा पीडितेला मानसिक त्रास झाला, तिच्या शारीरिक व मानसिक त्रासाची भरपाई कोण करणार? या संपूर्ण घटनेमध्ये दोषी कोण आहे? आरोपीच्या बचावासाठी न्यायासाठी लढणारे वकील अशा खालच्या थराला कसा जाऊ शकतो? असे प्रश्न उपस्थित झाले आहेत. दरम्यान एका पक्षाच्या महिला नेत्याने देखील सोशल मिडियावर पोस्ट केली होती, त्यानंतर देखील चर्चा झाल्या होत्या.