spot_img
Thursday, March 20, 2025

Latest Posts

निर्मिती उज्ज्वल भविष्याची : शिवणगाव येथील कुटुंबांसाठी महत्त्वाचा भूखंड वाटप कार्यक्रम

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात, महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी मर्यादित(एमएडीसी)चा नागपूर येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सहकार्याने शिवणगाव येथील प्रकल्पग्रस्त कुटुंबांसाठी भूखंड वाटप कार्यक्रम पार पाडला

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात, महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी मर्यादित(एमएडीसी)चा नागपूर येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सहकार्याने शिवणगाव येथील प्रकल्पग्रस्त कुटुंबांसाठी भूखंड वाटप कार्यक्रम पार पाडला. हा उपक्रम पुनर्वसन आणि शाश्वत शहरी विकास सुनिश्चित करण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे.

मिहान प्रकल्पाचा एक भाग म्हणून, एमएडीसीने चिंचभवन येथे आधुनिक नागरी सुविधांनी सुसज्ज १,५०० भूखंडांसह एक सुनियोजित पुनर्वसन लेआउट विकसित केला आहे. सुमारे ₹६६ कोटींच्या गुंतवणुकीसह, हा प्रकल्प सर्वसमावेशक वृद्धी आणि पायाभूत सुविधा विकासासाठी सरकारची वचनबद्धता अधोरेखित करतो.

कार्यक्रमादरम्यान, नागपूर येथील मिहान सेझ येथील सेंट्रल फॅसिलिटी बिल्डिंग (सीएफबी) च्या कॉन्फरन्स हॉलमध्ये पारदर्शक ‘लकी ड्रॉ’ प्रणालीद्वारे १८५ कुटुंबांना भूखंड वाटप करण्यात आले. लाभार्थ्यांनी त्यांच्या हक्काचे भूखंड मिळवून दिल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मनापासून आभार मानले.

हा उपक्रम न्याय्य शहरी विकास, प्रकल्पग्रस्त कुटुंबांचे कल्याण तसेच प्रगतीशील आणि सर्वसमावेशक महाराष्ट्रासाठी सरकारचे समर्पण अधोरेखित करतो.

हे ही वाचा:

अनिल परब यांनी केलेल्या चुकीच्या वक्तव्याबद्दल त्यांनी सभागृहाची जाहीर माफी मागावी – Pravin Darekar

….म्हणूनच छत्रपती शिवाजी महाराज आमचे आराध्य दैवत! – CM Devendra Fadnavis

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss