spot_img
Wednesday, February 19, 2025

Latest Posts

NANDURBAR मध्ये घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणण्यात गुन्हे शाखेला यश; लाखांचा मुद्देमाल हस्तगत

Nandurbar Crime: नंदुरबार जिल्हा पोलीस वसाहतीत अज्ञात चोरटयांनी सोने-चांदीचे दागिने व रोख रक्कम चोरून नेल्याची घटना घडली होती. ही घटना तसेच ईतर 3 गुन्हे उघडकीस आणण्यात जिल्हा पोलीस दलाला यश आले आहे. या घटनेत अंतर राज्य टोळीतील 5 जणांना ताब्यात घेऊन त्यांच्या कडून 23 लाखाहुन अधिकचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

स्थानिक गुन्हे शाखेला आरोपी मध्यप्रदेश येथे असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मध्य प्रदेश येथे जावून 5 संशयित आरोपींना ताब्यात घेतले. त्यांना गुन्हयाबाबत विश्वासात घेऊन विचारपूस केली असता त्यांनी त्यांचा इतर साथीदारांसह सदरचा गुन्हा केली असल्याची माहिती दिली. सदर आरोपीनी नंदुरबार जिल्हयातील नंदुरबार शहर, शहादा, तळोदा येथे चोरी केल्याचे सांगितले.आरोपींकडुन एकुण 23,34,310 रुपये किमतीचा सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे.

आरोपीनी महाराष्ट्र, आंध्रप्रदेश राज्यात सुध्दा घरफोडी केल्याची शक्यता असल्याचे वर्तवण्यात येत आहे.सदर ची कामगिरी जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त एस यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने केली आहे.

हे ही वाचा : 

नागरिकांना शासकीय सेवा मोबाईलच्या माध्यमातून उपलब्ध करून द्या – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

भारताची महान संस्कृती आणि परंपरा नवीन पिढीसमोर आणणे महत्त्वाचे – CM Devendra Fadnavis

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा .

Latest Posts

Don't Miss