Crime News: फसवणूक झालेल्या महिलेने वर्सोवा पोलिस गाठत आरोपींविरोधात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनीही गुन्हा नोंदवत तपासाला सुरुवात केली आहे.
राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि भाजप खासदार नारायण राणे (BJP MPNarayan Rane) यांच्या नावाचा वापर करून फसवणूक केल्याची धक्कदायक घटना समोर आली आहे. अंधेरीतील ५१ वर्षीय महिलेच्या मुलीला वैद्यकीय महाविद्यालयातून प्रवेश मिळवून देण्याचा अमिश दाखवत फसवणूक केल्याचे धक्कदायक प्रकरण समोर आले आहे.
फसवणूक झालेल्या महिलेने वर्सोवा पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी आरोपी मेघना सातपुते, नितेश पवार, सावंत काका आणि राकेश गावडे यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. या आरोपींनी वैद्यकीय महाविद्यालयातून प्रवेश मिळवून देण्याचा अमिश दाखवत या महिलेकडून ४५ लाख रुपये उकळल्याचे आरोप महिलेने तक्रारीत केले आहे. पीडित महिला खासगी रुग्णालयात वैद्यकीय सहाय्यक म्हणून काम करतात. या महिलेची मुलगी जी २३ वर्षाची असून ती ऑक्टोबर 2020 मध्ये नीट परीक्षेत 315 गुण मिळवले,ती सध्या बंगळुरूमध्ये बीएचएमएसच्या पहिल्या वर्षात शिकत आहे.
नेमकं प्रकरण काय?
या घटनेची दखल घेत मार्च २०२१ मध्ये पीडित महिला मुलीच्या वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेशासाठी प्रयत्न करत तक्रारदार महिलेची भेट तिच्या जुन्या मैत्रिणी मेघना सातपूतेशी झाली. या तक्रारदार महिलेची भेट सातपुतेने नितेश पवार व राकेश गावडे यांच्याशी करून दिली. यावेळी त्यादोघांनी सिंधुदुर्गातील एका वैद्यकीय शाळेत कार्यरत आहे असल्याचे सांगितले. क्रारदार महिलेच्या मुलीला व्यवस्थापन कोट्यातून वैद्यकीय महाविद्यालायत प्रवेश मिळेल असे सांगण्यात आले त्यासाठी १५ लाखाची मागणी करण्यात आली आणि तक्रारदा महिला यासाठी तयार झाली. त्यानंतरही तक्रारदार महिलेच्या मुलीला प्रवेश मिळाला नाही.
कोरोनामुळे टाळेबंदीनंतर सर्व नियम बदल्यामुळे प्रवेशासाठी पुन्हा लाख रुपये लागतील, असे सांगण्यात आले. अॅडमिशनच्या नावाखाली महिलेने आरोपींना 45 लाख रुपये दिले. अॅडमिशनच्या काळात कोणतेही कागदपत्र किंवा प्रवेश पत्र दिले नाही. पुन्हा लाखो रुपये भरल्यानंतरही प्रवेश न मिळाल्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर महिलेने वर्सोवा पोलिस ठाणे गाठत आरोपींविरोधात दिलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी गुन्हा नोंदवत तपास सुरू केला आहे. तक्रारदार महिला आरोपींना संपर्क साधण्याचा प्रयत्न करत होती, मात्र सर्वांनी त्यांचे मोबाईल मोबाईल बंद येत होती.
हे ही वाचा:
CM Devendra Fadnavis बंदुकीचे राज्य मोडून काढतील असा संजय राऊतांचा विश्वास
सगळे दोषी जोपर्यंत फासावर लटकत नाही तो पर्यंत सगळी कारवाई पोलीस करतील- Devendra Fadanvis.