spot_img
Thursday, March 20, 2025

Latest Posts

आंगणेवाडीच्या जत्रेत लाखो भाविकांसह राजकीय नेत्यांची गर्दी…

राज्यातील तमाम भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या आंगणेवाडीत शनिवारी २२ फेब्रुवारीला भराडी देवीच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी पहायला मिळाली. भराडी देवीच्या दर्शनाला राजकारण्यांची गर्दी हेदेखील आंगणेवाडीच्या जत्रेचे वैशिष्ठय मानले जाते. त्यानुसार शनिवारी भाविकांसह राजकारण्यांनी देवीच्या दर्शनासाठी हजेरी लावली.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातील मसुरे या १२ किलोमीटर अंतरावरील गावात आंगणेवाडी आहे.आंगणे कुटुंबियांच्या या वाडीतील भरडावर म्हणजेच माळावर ही देवी बसली आहे म्हणून तिला भराडी देवी म्हणतात. ही देवी भक्तांची मनोकामनापूर्ण करते अशी भक्तांची धारणा आहे. राज्यातील तमाम भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या आंगणेवाडीत शनिवारी २२ फेब्रुवारीला भराडी देवीच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी पहायला मिळाली. भराडी देवीच्या दर्शनाला राजकारण्यांची गर्दी हेदेखील आंगणेवाडीच्या जत्रेचे वैशिष्ठय मानले जाते. त्यानुसार शनिवारी भाविकांसह राजकारण्यांनी देवीच्या दर्शनासाठी हजेरी लावली.

यावेळी ठाकरे गटाचे खासदार वैभव नाईक यांनी भराडी देवीचे दर्शन घेऊन राजकीय नवस बोलला. “महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा सुख समृद्धी येवो, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली पक्ष पुन्हा एकदा उंच भरारी घेऊन दे, भराडी देवीच्या दर्शनाला येणाऱ्या लाखो भाविकांच्या सर्व इच्छा पूर्ण होऊन दे, ही प्रार्थना करतो. स्वार्थासाठी काही लोक शिवसेना सोडत आहेत.सामान्यातल्या सामान्य माणसाने शिवसेना वाढवली, सामान्य माणसांना घेऊन पुन्हा एकदा शिवसेना वाढवू, असा नवस केला.

केंद्रीय मंत्री नारायण राणे हे रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे खासदार आहेत. गेली ४० वर्षे नारायण राणे न चुकता या आंगणेवाडीच्या जत्रेला उपस्थिती देत आहेत. त्यांनीही त्यांच्या कुटुंबासमवेत भराडी देवीचे दर्शन घेतले. यावेळी नारायण राणे म्हणाले, “भराडी आईने आम्हाला खूप काही दिलंय, त्यामुळे आईकडे साकडं घालायला नाही तर आईचे आभार मानायला आलेलो आहे. आम्ही जे यशस्वी होतोय त्यामागे देवीचे आशीर्वाद आहेत.”

कोकणवासीयांचं आणि लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या सिंधुदुर्गातील मालवणमधील आंगणेवाडी भराडी देवीची यात्रा पहाटेपासून सुरु झाली आहे. आई भराडीच्या दर्शनाला लाखो भाविकांसह अनेक राजकीय नेत्यांची गर्दी पहायला मिळाली. राज्याचे माजी शिक्षण मंत्री तथा आमदार दीपक केसरकर यांनी आज श्रीदेवी आंगणेवाडी येथील भराडी मातेच्या चरणी लीन झाले. महाराष्ट्रातील शेतकरी, दिन दुबळे यांना देवीचा आशीर्वाद मिळावा यासाठी त्यांनी प्रार्थना केली. तर आशिष शेलार यांनीही मुंबईकरांची सेवा करण्याची संधी आम्हाला दे असं साकडं घातले.

गणेशोत्सवासाठी POP आणि उंच मूर्तींना बंदी; मुंबई महानगरपालिकाकडून परिपत्रक जारी

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss