गडचिरोलीतील एका जवानाने स्वतःच्या डोक्यात गोळी झाडून स्वतःला संपवलं. गडचिरोलीच्या धानोरा येथील सीआरपीएफ कॅम्पमध्ये कार्यरत होता. ही घटना सोमवारी (२४ फेब्रुवारी) ला हि घटना घडली. गिरीराज राम नरेश किशोर (३०) रा. आग्रा असे जवानाचे नाव आहे. गिरीराज हे धानोरा येथे ११३ बटालियन मध्ये कार्यरत होते.
मिळालेल्या माहिती नुसार, गिरीराज हे कालच म्हणजे २३ फेब्रुवारीला आपली सुट्टी संपवून धानोरा येथे सीआरपीएफ कॅम्पमध्ये कर्तव्यावर रुजू झाले होते. अश्यातच आज सकाळी साडेदहाच्या सुमारास स्वतःच्या डोक्यात गोळी झाडल्याने त्यांना धानोरा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. गिरीराज ने टोकाचे पाऊल का उचलले? हे अद्याप कळू शकले नाही. सध्या पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहे.
ही वाचा:
Uddhav Thackeray : असले गयेगुजरे लोक आहेत त्यांच्याकडे मी लक्ष देत नाही – उद्धव ठाकरेंचं उत्तर
MSRTC: परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे कर्नाटक संदर्भात महत्त्वाचे आदेश