Wednesday, April 24, 2024

Latest Posts

Monsoon पूर्वी चक्रीवादळ होणार दाखल? ‘Biparjoy’ चक्रीवादळाचा धोका

जून ओलांडला आहे. सर्वजण पावसाची आतुरतेने वाट पाहत आहेत. यातच आता चक्रीवादळाचा धोका निर्माण झाला आहे. अरबी समुद्रात बिपारजॉय हे चक्रीवादळ निर्माण झाले आहे. यामुळे पावसाची प्रतिक्षा आणखीनच लांबणीवर गेली आहे. बिपारजॉय हे वादळ ५ जून रोजी अरबी समुद्रात तयार झाले असून येत्या २४ तासांत चक्रीवादळ निर्माण झालेल्या प्रदेशात कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता भारताच्या हवामान विभागाने (IMD) वर्तवली आहे. हवामान खात्याद्वारे या वादळाला ‘बिपारजॉय’ हे नाव देण्यात आले आहे. मॉन्सून आधी निर्माण झालेल्या या धोक्यामुळे पावसावरही मोठा परिणाम झाला आहे.

बिपरजॉय वादळासंदर्भात मुंबई हवामान खात्याने ट्विट करत माहिती दिली आहे. हवामान खात्याने आपल्या ट्विटमध्ये सांगितले की, दक्षिण पूर्व अरबी समुद्रावर चक्रीवादळ तयार झालं आहे. हे चक्रीवादळ सरासरी समुद्रसपाटीपासून ५.८ किलोमीटरपर्यंत पसरलं आहे. या चक्रीवादळामुळे पुढील २४ तासांत दक्षिण पूर्व अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची दाट शक्यता आहे.

तसेच, हवामान खात्याने मच्छिमारांना सुद्धा सावधगिरीचा इशारा दिला आहे. हवामान खात्याद्वारे मच्छिमारांना ‘पुढील ४८ तासांत चक्रीवादळ जवळपास उत्तरेकडे सरकण्याची आणि आग्नेय आणि लगतच्या पूर्वमध्य अरबी समुद्रावरील दबाव क्षेत्र तीव्र होण्याची शक्यता आहे. खोल समुद्रात मासेमारीसाठी समुद्रात जाताना मच्छीमारांनी सावध राहावे’ असे सांगण्यात आले आहे.

बिपरजॉय वादळामुळे पश्चिम किनारपट्टीसह उत्तर भागात धोका निर्माण झाला आहे. स्कायमेट या खाजगी हवामान अंदाज वर्तवणाऱ्या संस्थेनुसार, भारताच्या देशाच्या पश्चिम किनारपट्टीसह उत्तरेकडे चक्रीवादळ मार्गक्रमण करण्याची शक्यता आहे. तर, चक्रीवादळ भारताच्या उत्तरेसह ओमान आणि येमेनच्या दिशेने ईशान्य दिशेने वळण्याची शक्यताही वर्तवण्यात आली आहे.

हे ही वाचा : 

आजचे राशिभविष्य, ०६ जून २०२३, आरोग्यासाठी उत्तम …

रुळावरून घसरलेली रेल्वे अशाप्रकारे परत रुळावर आणली जाते; जाणून घ्या सविस्तर

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss