spot_img
Wednesday, February 19, 2025

Latest Posts

DCM Eknath Shinde on Union Budget 2025: आता घराघरात लक्ष्मीची पावलं उमटल्याशिवाय राहणार नाहीत…उपमुख्यमंत्री नेमकं काय म्हणाले?

Union Budget 2025: मोदी कॅबिनेट ३.० चा भारताचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री Nirmala Sitharaman यांच्याकडून आज १ फेब्रुवारी २०२५ ला सकाळी ११ वाजता सादर करण्यात आला. आजच्या अर्थसंकल्पात कोणत्या महत्वाच्या घोषणा करणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असताना केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी मध्यमवर्गीयांसाठी मोठी घोषणा केली. यंदाच्या बजेटमध्ये १२ लाखांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त करण्यात आलं आहे. याबाबत आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. एक्स या समाजमाध्यमाद्वारे एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या भावना व्यक्त करत अर्थमंत्र्यांचे आभार मानले आहेत.

काय म्हणाले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे? 

लक्ष्मीच्या पाऊलखुणा उमटल्या… देशाचे लोकप्रिय आणि कर्तृत्ववान पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजींनी विकसित भारताचं पाहिलेलं स्वप्न प्रत्यक्षात येणार, याची खात्री देणारा केंद्र सरकारचा अर्थसंकल्प आहे. अर्थसंकल्पात सामान्य नोकरदार वर्गाला जो दिलासा मिळालाय, त्याचं वर्णन अभूतपूर्व असंच करावं लागेल. १२ लाखापर्यंतच्या उत्पन्नावर संपूर्ण करमुक्ती मिळाल्याने आता घराघरात लक्ष्मीची पावलं उमटल्याशिवाय राहणार नाहीत. एक सर्वांगसुंदर, आत्मनिर्भर भारताला सबळ करणारा हा अर्थसंकल्प सादर केल्याबद्दल मी आदरणीय केंद्रीय अर्थमंत्री श्रीमती निर्मला सीतारामन यांचे अभिनंदन करतो, आणि महाराष्ट्रातल्या तमाम नोकरदारांतर्फे त्यांचे आभारही मानतो. शिक्षण, आरोग्य आणि कृषी या तिन्ही महत्त्वाच्या क्षेत्रांना अर्थसंकल्पातील कल्पक तरतुदींचा लाभ होणार असल्याने देशाच्या प्रगतीचा आलेख अधिकाधिक उंचावत जाणार यात शंकाच नाही. हा सशक्त भारताचा रोडमॅप आहे. दुरवस्था संपवून पंतप्रधान मोदीजींच्या नेतृत्त्वात आपला भारत देश सुबत्तेच्या दिशेनं वाटचाल करु लागल्याची ही शुभचिन्हे आहेत.

ऑनलाईन प्लॅटफॉर्मची काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी योजना

सक्षम अंगणवाडी आणि पोषण २.० योजना जाहीर तर ८ कोटींहून अधिक मुलांना पोषक आहार पुरवला जाईल. सर्व सरकारी माध्यमिक शाळा व प्रायमरी आरोग्य केंद्रांना ब्रॉडबँड सेवा पुरवली जाईल. अटल टिकरिंग लॅब अशा ५० लाख लॅब पुढच्या पाच वर्षात सरकारी शाळांमध्ये उभ्या केल्या जातील. ऑनलाईन प्लॅटफॉर्मची काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी योजना, ई श्रम पोर्टलवर कामगारांची नोंदणी होणार असल्याची घोषणा केली आहे.

हे ही वाचा :

Union Budget 2025: केंद्रीय अर्थसंकल्पात युवक, रोजगार आणि शिक्षण क्षेत्रासाठी मोठी घोषणा

शेतकऱ्यांना अर्थसंकल्पात काय मिळालं? कृषी बजेटमधील १० महत्वाचे मुद्दे कोणते

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा .

Latest Posts

Don't Miss