आज १८ सप्टेंबर रोजी महाराष्ट्राच्या राजकारणाच्या दृष्टीने दोन महत्वाच्या सुनावण्या आज होणार आहेत. ही दोन्ही प्रकरण शिवसेनेशी (Shivsena)संबंधित आहेत. शिवसेना पक्ष आणि चिन्ह या निवडणूक आयोगाच्या निकालाविरोधात ठाकरे गटाच्या याचिकेवर आज सुनावणी होणार आहे. तर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narevekar) यांच्यावर दाखल करण्यात आलेल्या याचिके बाबत आज सुनावणी होणार आहे. सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड, न्यायमूर्ती पारडीवाला, न्यायमूर्ती मनोज मिश्रा यांच्या खंडपीठात ही सुनावणी होणार आहे. या दोन्ही याचिकेचे क्रमांक १८ आणि १९ असे आहेत.
आज शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण या दोन्ही गोष्टीवर आज सुनावणी होणार आहे. शिवसेनेच्या दोन मोठ्या याचिकांवर होणार सुनावणीवर आज सगळ्यानचे लक्ष लागले आहे. या आधी निवडणूक आयोगाने शिवसेना पक्ष आणि चिन्ह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे याना दिला आहे. त्यानंतर ठाकरे गटाने या निर्णयावर याचिका दाखल केली. आज सरन्यायाधीशांच्या अध्यक्षतेखालील त्रिसदस्यीय खंडपीठासमोर ही सुनावणी पार पडणार आहे. आमदारांच्या निलंबनासंदर्भात अध्यक्षांना तातडीने निर्णय घेण्याचे निर्देश द्यावेत अशी विनंती याचिकेत करण्यात आली आहे.विधानसभा अध्यक्ष यांच्याविरोधात ठाकरे गटाच्या याचिकेवर आज सुनावणी होणार आहे. महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा सुप्रीम कोर्टात निकाल लागला. त्यानंतर निवडणूक आयोगाने शिवसेना पक्षाचं नाव आणि चिन्ह वापरण्याचा अधिकार शिंदे गटाला दिला.नंतर ठाकरे गटाकडून सुप्रीम कोर्टात निवडणूक आयोगाच्या निर्णयाबाबत याचिका दाखल करण्यात आली. सत्तासंघर्षावरील याचिकेवर सुनावणी सुरु असतानाच ही याचिका दाखल झाली होती. पण त्यावर सुनावणी झाली नाही. तर आज या याचिकेवर सुनावणी होईल.
गेल्यावर्षी एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेच्या ४० आमदारांनी बंडखोरी केली होती. शिवसेनेच्या शिंदे गटातील १६ आमदारांच्या अपात्रेसंदर्भात निर्णय विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी निर्णय न घेतल्यामुळे ठाकरे गटाने सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली. १६ आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय विधानसभा अध्यक्षांना लवकर घेण्याचे निर्देश द्यावेत अशी मागणी याचिकेत केली होती. सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील त्रिसदस्यीय पीठासमोर सुनावणी होणार आहे. त्यामुळे सुप्रीम कोर्ट यामध्ये पडणार का, या सुनावणीत नेमकं काय होणार, कोर्ट काही निर्देश देणार का याची उत्सुकता लागली आहे.
हे ही वाचा:
टोमॅटो उत्पादक शेतकरी संकटात, जगताप यांनी केंद्र सरकारवर केली टीका
सांगलीतील मराठा समाज आक्रमक, मोठ्या संख्येने महिलांचा सहभाग