spot_img
spot_img
Friday, September 22, 2023
spot_img
spot_img

Latest Posts

जालन्यातील घटनेनंतर उद्या औरंगाबाद बंदची मागणी

राज्यभरात सगळीकडे जालना (Jalna) येथील आंदोलकांवर केलेल्या लाठीमाराचे पडसाद उमटले आहेत.

राज्यभरात सगळीकडे जालना (Jalna) येथील आंदोलकांवर केलेल्या लाठीमाराचे पडसाद उमटले आहेत. जालन्यातील अंतरवाली सराटी येथे मराठा समाज आरक्षण मागणीसाठी आंदोलन करण्यासाठी बसले होते तेव्हा पोलिसांनी त्यांच्यावर लाठीमार केला. या लाठीमाराचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रभर उमटले आहेत. राज्यात ठिकठिकाणी आंदोलन केली जात आहेत. याचा पार्श्ववभूमीवर औरंगाबाद (Aurangabad) जिह्ल्यात उद्या ०४ सप्टेंबर २०२३ रोजी बंदची मागणी करण्यात आली आहे. उद्या औरंगाबाद शहरासह, संपूर्ण ग्रामीण भाग बंद करण्याची मागणी केली जात आहे. जालना येथील घटनेनंतर सकल मराठा समाजाची आणि मराठा क्रांती मोर्च्याची बैठक घेण्यात आली. या बैठकीत औरंगाबाद बंदचा निर्णय घेण्यात आला आहे. जालन्यातील घटनेचे पडसाद औरंगाबादमध्ये देखील उमटले आहेत. शुक्रवारी जिह्ल्यात अनेक ठिकाणी आंदोलन करण्यात आले. काही ठिकाणी रस्ता रोको आंदोलन करण्यात आले होते. आक्रमक झालेल्या आंदोलकांनी ठिकठिकाणी टायर पेटवून देऊन घटनेचा निषेद केला आहे. घडलेल्या या सर्व घटनेनंतर सकल मराठा समाजाची बैठक घेण्यात आली. बैठकीत सोमवारी औरंगाबादचा निर्णय घेण्यात आला आहे.

मराठा समाजाचे संपूर्ण राज्यभरात मोर्चे निघणार आहे. राज्यभरात ५७ ठिकाणी मराठा समाजाने मोर्चे काढले आहेत. या आंदोलनात विशेष म्हणजे ‘ ‘एक मराठा लाख मराठा’ च्या घोषणा देण्यात आल्या. हा मोर्चा औरंगाबाद शहरातून निघाला आहे. या आंदोलनात लाखो संख्यने मराठा समाज सहभागी झाला आहे. मराठा समाजाच्या आरक्षणासाठी औरंगबाद जिल्हा हा खूप महत्वाचा आहे. त्यामुळे जालना येथे घडलेल्या निषेधार्थ औरंगाबाद जिल्हा बंद करण्यात येणार आहे.

जालना येथील घटनेनंतर संपूर्ण जिल्हात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. औरंगाबादमध्ये शहर आणि ग्रामीण भागात पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे. तसेच जालना आणि औरंगाबाद येथील सीमा भागात पोलीस बंदोबस्त आधीच लावण्यात आला आहे. ०४ सप्टेंबर रोजी औरंगाबाद जिल्हा बंद करण्याच्या आदेशानंतर मोठ्या प्रमाणावर पोल्स बंदोबस्त करण्यात आला आहे. कुठलाही चुकीचा प्रकार घडू नये म्हणून पोलीस खबरदारी घेणार आहेत. जिह्ल्यातील काही महत्वाच्या भागात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. जालन्यातील लाठीमाराचे पडसाद संपूर्ण राज्यभर उमटले आहे.

Latest Posts

Don't Miss