spot_img
Wednesday, February 19, 2025

Latest Posts

वाल्मिक कराडचा खंडणी प्रकरणातील जामीन अर्ज मागे; प्रकृती बिघडल्याने जिल्हा रुग्णालयात दाखल

बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणात वाल्मिक कराड याला अटक करण्यात आली आहे. त्याचा जमीन अर्ज त्याच्या वकिलांनी अचानक मागे घेतला आहे. त्याच्या तब्येतीतही बिघाड झाल्याची माहिती समोर आली आहे. पोटदुखीच्या तक्रारीने त्याला बीड जिल्हा रुग्णालयात दाखल झाले आहेत. त्याच्यावर उपचार सुरु असून अनेक चाचण्या करण्यात येत आहेत.

वाल्मिक कराड याचा खंडणी प्रकरणातील जामीन अर्ज करण्यात आला होता. जामीन सुनावणीसाठी दोन तारखा झाल्यानंतर आज सुनावणी होणार होती. त्यामुळे कराडला जामीन की एमसीआर होणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले होते. मात्र वाल्मिकीचे वकील अशोक कवडे यांनी जामीन अर्ज मागे घेतला आहे. जामीन अर्ज मागे घेण्याचं कारण अद्याप समोर आले नाही आहे. मात्र, कराड याने अर्ज मागे घेतल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.

आता वाल्मिक कराडचे प्रकृतीही बिघडल्याचे समोर आले आहे. वाल्मिक कराडला पोटदुखीचा त्रास होत आहे. त्यामुळे त्याला रुग्णालयात भरती करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. याबाबत बीड जिल्ह्या रुग्णालयाचे प्रभारी शल्यचिकित्सक डॉक्टर एस. बी. राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

वाल्मिक कराड रुग्णालयात दाखल

वाल्मिक कराडला पोटात दुखण्याचा त्रास होत असल्याचे जिल्हा कारागृहाकडून कळवण्यात आले होते. त्यानुसार कारागृहात जाऊन तपासणी करण्यात आली. पुढील तपासणी करण्यासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करणे गरजेचे असल्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. त्यानुसार कारागृह प्रशासनाने जिल्हा रुग्णालयात दाखल केले होते. कराडवर सध्या उपचार सुरू आहेत. काही तपासणी करणे गरजेचे आहे. सोनोग्राफी, रक्त चाचणी, यूरिन टेस्ट केली जाणार आहे. त्याचा अहवाल आल्यानंतर पुढील निर्णय घेतला जाईल, असं एसबी राऊत म्हणाले. पोटदुखीचा त्रास होत असताना वाल्मिक कराडला काल रात्री 12.30 वाजता जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. सध्या याच ठिकाणी त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

हे ही वाचा : 

Latest Posts

Don't Miss