गोवंश कत्तलीला राज्यात बंदी आहे. यवतमाळ जिल्ह्याला लागून तेलंगणा व आंध्रप्रदेश ही राज्ये आहेत. बंदी असूनही यवतमाळ जिल्ह्यात जनावर तस्करीचा खेळ खुलेआम सुरू आहे. वणी, पांढरकवडा तालुक्यात होणारी जनावर तस्करी सर्वश्रुत आहे. हजारो जनावरांची तस्करी करून कत्तल केली जाते. जनावर तस्करीत मुख्य आरोपीचे नाव रेकॉर्डवर येत नसल्याने कारवाईवर प्रश्न चिन्ह निर्माण होत आहे. वणीमध्ये गोवंश कत्तल आढळून आल्यानंतर गोवंश आयोग समितीने स्पॉट पंचनामा केला. यात अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. यवतमाळ जिल्ह्यातील १६ ही तालुक्यात गोवंश कत्तलीसह तस्करीचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. केवळ पैसा कमविण्याच्या लालसेतून अनेक जण यात गुंतले आहेत. तस्करी करणाऱ्यांविरोधात वर्षभरात पोलिसांनी १२५ कारवाया करून २९१ आरोपी विरुद्ध गुन्हे दाखल केले तरी जनावर तस्करीला कुठेही लगाम बसला नाही.
वणीमध्ये गोवंश प्रकरणाचा गोवंश आयोग समितीला स्पॉट पंचनामा करताना बांगलादेशातील एका व्यक्तीचे आधार कार्ड आणि पॅन कार्ड आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. यवतमाळच्या वणी येथे आठवडाभरापूर्वी गोवंशाचे मुंडके आणि अवशेष आढळून आले होते. दरम्यान संतप्त झालेल्या बजरंग दल, भाजपा यासह इतर संघटनांनी रस्त्यावरून गोवंश तस्करांना जेरबंद करण्यात यावे अशी मागणी करण्यात आली होती. प्रशासनाने दखल घेत गोवंश आयोग समिती गठित करून वणीमध्ये दाखल झाली. यावेळी समितीने ज्या ठिकाणी गोवंश आढळून आले होते त्या ठिकाणी स्पॉट पंचनामा केला. तेव्हा त्या ठिकाणी गोवंशाचे ६७ टॅग आढळून आले. एकाच नावाचे आधार कार्ड आणि पॅन कार्ड हे बांगलादेशाशी कनेक्शन असल्याचा प्राथमिक संशय व्यक्त केल्या जात आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पांढरकवडा तालुक्यातील वाराकवठा येथे एक जनावर तस्करी करणारा ट्रक पकडला. यातील चालक आणि वाहक पसार झाले. पोलिसांनी ट्रक ताब्यात घेतला आहे. परंतु,जनावर तस्करीत मुख्य आरोपीचे नाव रेकॉर्डवर येत नसल्याने कारवाईवर प्रश्न चिन्ह उपस्थित करण्यात येत आहे. जनावर तस्करी आणि कत्तल रोखन्यासाठी प्रशासन गंभीरतेने दखल घेत नसल्याने संताप व्यक्त होतं आहे. याचा बांगलादेशाशी कनेक्शन असल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
गोमातेला राजमातेचा दर्जा मिळाला. वणीयेथील घटनेचे गोसेवा आयोगाने गंभीर दखल घेतली आहे. शेतकऱ्यांसाठी गाय हे वरदान आहे. गायीच्या आधारे शेती केल्यास त्याचा फायदा शेतकऱ्यांना होईल. देशी गायीचे महत्व वाढत आहे. कुणीही गाय कसायला देऊ नये अशी विनंती गोसेवा समितीच्य सदस्यानी नागरिकांनी केली आहे. वणीत गोवंशाचे शीर आढळून आल्याने हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्या. त्यांनी कडक कारवाई करण्याची मागणी केली. २०० पेक्षा जास्त गायीची कत्तल करण्यात आली आहे. ट्रॅक्टरने हाडे बाहेर फेकण्यात आली आहे. अनेक बाबी समोर आल्या आहे. वणीत गोवंश कत्तल सुरू आहे. १५० गायीचे मुंडके आढळून आले आहे. याची सखोल चौकशी करण्यात यावी. मोठे गोदाम बांधण्यात आले ते तोडण्यात यावे. कत्तल करणे बंद करण्यात यावे अशी मागणी ग्रामस्थ आणि राम नवमी समितीच्या वतीने करण्यात आली आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पांढरकवडा तालुक्यातील वाराकवठा येथे एक जनावर तस्करी करणारा ट्रक पकडला. यातील चालक आणि वाहक पसार झाले. पोलिसांनी ट्रक ताब्यात घेतला आहे. पुढील कारवाई सुरू आहे अशी माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरक्षक धनराज हाके यांनी दिली आहे.
हे ही वाचा :
Follow Us
टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा .