spot_img
Saturday, January 11, 2025

Latest Posts

Devendra Fadnavis यांनी व्यक्त केली ‘या’ जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाची इच्छा

विधानसभा निवडणूक निकालानंतर मुख्यमंत्रीपद आणि उपमुख्यमंत्रीपदाचे वाटप आणि शेवटी खातेवाटप या गोष्टी चर्चेचा विषय बनल्या. या वेळी अनेक राजकीय घडामोडींनंतर या गोष्टींबाबत निर्णय घेण्यात आले.

विधानसभा निवडणूक निकालानंतर मुख्यमंत्रीपद आणि उपमुख्यमंत्रीपदाचे वाटप आणि शेवटी खातेवाटप या गोष्टी चर्चेचा विषय बनल्या. या वेळी अनेक राजकीय घडामोडींनंतर या गोष्टींबाबत निर्णय घेण्यात आले. आता सत्ताधारी गोटात पालकमंत्रीपदाबाबत मोठी चर्चा पाहायला मिळत आहे. ज्या आमदारांना मंत्रिमंडळात स्थान मिळालं नाही अशा नाराज आमदारांना पालकमंत्रिपदाच्या यादीत समाविष्ट करण्याकडे सत्ताधाऱ्यांचा कल असू शकतो. हे सर्व खरे असले तरी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पालकमंत्रीपदाची इच्छा व्यक्त केली आहे.

महाराष्ट्रातल्या सर्व जिल्ह्यांच्या पालकमंत्रीपदासाठी तिन्ही सत्ताधारी पक्षांमध्ये रस्सीखेच पाहायला मिळत आहे. आमदारकीप्रमाणेच तिन्ही पक्षामधील नेत्यांकडे असणारी पालकमंत्रीपद पुन्हा मागितली जात आहेत. कोणत्या पक्षाला किती व कोणत्या जिल्ह्यांची पालकमंत्रिपद मिळणार यावर त्या त्या पक्षातील कोणत्या आमदारांची वर्णी लागणार हे ठरू शकेल. अशातच आता देवेंद्र फडणवीसांनी गडचिरोली जिल्ह्याचं पालकमंत्रिपद स्वतःकडे ठेवायला आवडेल असे म्हटल्याने राजकीय वर्तुळात चर्चाना उधाण आले आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत अनेक राजकीय मुद्द्यांवर उत्तरे देताना पालकमंत्रीपदाबाबत प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे निर्णय घेतील असे सांगितले. त्यांनी मला बीडला पाठवलं तर बीडला जाईन. पण माझ्या मते साधारणपणे मुख्यमंत्री स्वतः कडे कोणतं पालकमंत्रीपद ठेवत नाहीत. पण माझी इच्छा अशी आहे की, गडचिरोलीचे पालकमंत्रिपद माझ्याकडे ठेवावं. त्याला तिन्ही नेत्यांची परवानगी असेल तर ते होईल , असे देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं आहे.

हे ही वाचा:

तीन दिवस पावसाचा इशारा; पुणे शरासह १६ जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता

“आता खरी मजा आहे”, Manoj Jarange Patil यांची Devendra Fadnavis यांच्यावर टीका

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss