बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आली. धनंजय देशमुख यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराडवर मकोका लावून संतोष देशमुख यांच्या हत्येशी संबंधित खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी देखील केली जातंय. धनंजय मुंडे हे भगवानगडावर पोहोचले आणि त्यांनी महंत नामदेव शास्त्री महाराज यांची भेट घेतली. भगवानगड धनंजय मुंडेंच्या पाठीशी भक्कमपणे उभे असल्याचे भूमिका महंतांनी घेतली. नामदेव शास्त्रींनी धनंजय मुंडे यांना टार्गेट केले जात असल्याचे म्हटले.
आता आज देशमुख कुटुंबीयांनी नामदेव शास्त्रींची भेट घेतली आहे. यावेळी त्यांनी संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय यांनी नामदेव शास्त्रीकडे काही पुरावे दिले. संतोष देशमुख हे भगवानगडावर येत असल्याचे त्यांनी काही फोटो दाखवले. यावेळी त्यांनी म्हंटले की २२ वर्षांपासून मनोहर मुंडे करायचे. ते मागच्या महिन्यात वारले आहे. त्यांनी जे पिकवले तेच आम्ही खातो. त्यांची पोरं पुण्यात असतात. या घटनेनंतर देशमुख कुटुंबियांनी कधीही जातीयवाद केला नाहीये. माझ्या भावाने दलित मुलाला वाचवण्याचा प्रयत्न केला. यावर महंत नामदेव शास्त्री यांनी म्हटले की, आरोपींना पाठिशी घालणार नाहीये.
देशमुख कुटुंब भगवानगडाला मानणारे आहे. देशमुख कुटुंबियांच्या मागे आम्ही आहोत. भगवानगड तुमच्या पाठिशी आहे, असेही महंतांनी म्हटले आहे.पुढे नामदेव शास्त्री यांनी म्हटले की, खऱ्या आरोपीला शिक्षा व्हावी, हे माझे भगवानगडाच्या गादीवरून सांगणे आहे. काहीवेळ धनंजय देशमुख आणि नामदेव शास्त्री यांच्यामध्ये संवाद झालाय. संतोष देशमुख हत्ये प्रकरणातील एक आरोपी अजूनही फरार आहे. इतर आरोपींची चाैकशी सुरू आहे. एसआयडी, सीआयडी या हत्येचा तपास करत आहे. आमदार सुरेश धस आणि संदीप क्षीरसागर यांच्याकडून सातत्याने धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे.
हे ही वाचा :
Union budget मध्ये अनु क्षेत्रासाठी २० हजार कोटीची तरतूद