बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय वाल्मिक कराड याला अटक करण्यात आली आहे. वाल्मिक कराड याच्या कोठडीतील मुक्काम आणखी १४ दिवस वाढणार आहे. त्याचसोबत धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरत आहे. या प्रकरणात आता भगवानगडानंर नारायणगडाचे महंत शिवाजी महाराज यांची एंट्री झाली. यांच्या एन्ट्रीने या प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे.
संतोष देशमुख यांची हत्या होऊन तब्बल ५६ दिवस उलटले आहेत. ७ आरोपींमधून अजूनही एक आरोपी फरार आहे. संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी फरार आरोपी विष्णू चाटेच्या विरुद्धच्या खळबळजनक वक्तव्य केलं आहे. फरार आरोपी विष्णु चाटेच्या फोनवरून अनेक वरिष्ठांना फोन गेलेत. या प्रकरणातून कसं वाचायचं या संधर्भात बोलणं झालं असल्याचं खळबळजनक वक्तव्य केलं आहे. केवळ पुरावा नष्ट केल्याचा गुन्हा त्याच्यावर दाखल केला गेल्याने आम्ही समाधानी नसल्याचेही ते म्हणालेत.
काय म्हणाले धनंजय देशमुख?
संतोष देशमुख यांच्या खूनाला 56 दिवस उलटले आहेत. तरीही कृष्णा आंधळे अजूनही फरार आहे. बीड पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यावर गंभीर आरोप करत धनंजय देशमुख यांनी कृष्णा आंधळेला पोलिसांनी वेळीच अटक केली असती तर आमच्या कुटुंबावर ही दुर्दैवी वेळ आली नसती असा आरोप केलाय. ते म्हणाले, ‘ कृष्णा आंधळे फरार असताना तू पोलिसांसोबत फिरत होता. विष्णू चाटेचा मोबाईल मिळाला पाहिजे. त्यात अनेक व्हिडिओ आहेत. काही महत्त्वाचे पुरावे आहेत. या आरोपीवर केवळ पुरावा नष्ट केल्याचा गुन्हा नोंद करून काहीच उपयोग नाही. असंही 100% या आरोपींना फाशी होणार आहे, पण त्या मोबाईलमध्ये जे काही पुरावे आहेत, व्हिडिओ, ऑडिओ क्लिप ,काही फोन कॉल आहेत याची सगळी जबाबदारी ही प्रशासनाला घ्यायची आहे. यासंदर्भात गांभीर्याने दखल घ्यावी अशी विनंती मुख्यमंत्री साहेबांना मी काल केली आहे. आरोपींना फाशी होणार आहे पण विष्णू चाटेच्या मोबाईलमध्ये जे गंभीर गुन्ह्यांचा डाटा आहे. तो आपल्याला पाहिजे. आरोपीचे त्याच्यामध्ये सगळे डिटेल्स असणारे व्हिडिओ कॉल, फोन कॉल, ऑडिओ क्लिप आहे. यातून अनेक वरिष्ठांना कॉल करण्यात आलेले आहेत. ज्यांनी हा खून केलेला आहे, हे संघटित गुन्हेगारीचा मोठ जाळं आहे. त्यांचा मोबाईल समोर आणल्याशिवाय अनेक गोष्टी समोर यायच्या आहेत त्या माहीत होणार नाहीत असं धनंजय देशमुख म्हणाले.
हे ही वाचा :
CIDCO च्या २६००० घरांच्या अर्जदारांची यादी ३ फेब्रुवारीला होणार प्रकाशित; सोडत कधी होणार जाहीर?
Konkan Hearted Girl अंकिता प्रभू वालावलकरने नवऱ्यासह Raj Thackeray ना दिले लग्नाचे खास आमंत्रण