Dhananjay Munde : सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात सातत्याने होत असलेल्या आरोपांनंतर अखेर धनंजय मुंडे यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला. मात्र राजीनामा दिल्यानंतरही धनंजय मुंडे यांच्या अडचणी काही कमी होताना दिसत नाही. एकीकडे पत्नी करुणा मुंडे यांनी केलेले आरोप, संतोष देशमुख हत्याप्रकरण, राजीनामा, त्यात नुकताच त्यांना बेल्स पाल्सी हा आजार या सगळ्यांनी ग्रासलेले असतानाच आता धनंजय मुंडे यांच्या मागे ईडी चौकशीचा फेरा लागण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र राज्याचा अर्थसंकल्प (Maharashtra Budget 2025) १० मार्च सोमवारी सादर केला जाणार आहे. अर्थमंत्री अजित पवार (Deputy Chief Minister and Finance Minister Ajit Pawar) हे राज्याचा अर्थसंकल्प विधिमंडळात मांडतील. अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वी राज्याच्या आर्थिक स्थितीचे दर्शन घडविणारा आर्थिक पाहणी अहवाल (Economic Survey Report) सादर करण्यात आला आहे.
धनंजय मुंडे यांच्या कार्यकाळात कृषी विभागात मोठा घोटाळा झाल्याचा आरोप करण्यात येत आहे. तब्बल २०० कोटींचा घोटाळा झाल्याचा दावा करण्यात येत आहे. कृषी विभागातील या घोटाळ्याची ईडीकडे भाजप आमदार सुरेश धस ईडीला पत्र लिहून तक्रार करणार आहे. तत्कालीन कृषिमंत्री धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांनी कृषी विभागाची २०० कोटींची रक्कम परस्पर उचलल्याचा धस यांचा दावा आहे.
दरम्यान, सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी देखील धनंजय मुंडे यांच्यावर कृषीमंत्री असताना जवळपास २४५ कोटी रुपयांचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप केला होता. राज्यातील सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना बळकटी देण्यासाठी सरकारने योजना सुरू केली होती. या योजनेतील नियमांना धाब्यावर बसवून धनंजय मुंडे यांनी कृषीमंत्री असताना कोट्यवधींचा घोटाळा केल्याचा आरोप अंजली दमानिया यांनी केला आहे. या योजनेअंतर्गत कापूस गोळा करण्याच्या बॅग, नॅनो युरिया, नॅनो डीओबी, फवारणी पंप अशा वस्तूंची खरेदी करण्यात आली. मात्र या वस्तूंची खरेदी बाजारभावापेक्षा महाग करण्यात आली. यामुळे कमी शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेता आला.
हे ही वाचा :
Navneet Rana : औरंगजेबाबद्दल ज्यांना प्रेम आहे त्यांनी आपल्या घरात त्याची कबर लावून घ्या- नवनीत राणा
Follow Us