Dhananjay Munde News : विधानसभा निवडणुकीत धनंजय मुंडे यांनी शपथपत्रामध्ये खोटी माहिती दिल्याबाबतची तक्रार करुणा शर्मा (Karuna Sharma) यांनी ऑनलाईन पद्धतीने दाखल केली होती. धनंजय मुंडे हे संतोष देशमुख हत्या प्रकरणापासून सतत चर्चेत आहेत. रोज त्यांच्यावर नवीन आरोप (Allegations) लावले जात आहे. धनंजय मुंडे यांच्या अडचणीत दिवसेंदिवस भर पडताना दिसत आहे. संतोष देशमुख (Santosh Deshmukh) हत्या प्रकरणामुळे आरोपांच्या फेऱ्यात अडकलेल्या धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांची डोकेदुखी आणखी वाढण्याची शक्यात आहे. धनंजय मुंडे यांनी निवडणूक शपथपत्रात खोटी माहिती सादर केल्याची तक्रार करुणा मुंडे यांनी केली आहे. या प्रकरणाची सुनावणी आज (24 फेब्रुवारी) परळी न्यायालयात पार पडणार आहे.
विधानसभा निवडणूक (Vidhansabha Election) नुकतीच पार पडली. या निवडणुकीत धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी शपथपत्रामध्ये खोटी माहिती दिल्याबाबतची तक्रार करुणा शर्मा यांनी ऑनलाईन पद्धतीने दाखल केली होती. त्यानंतर न्यायालयाने धनंजय मुंडे यांना कारणे दाखवा नोटीस बजावली होती. याबाबत आज न्यायालयात सुनावणी होणार आहे.या सुनावणीत नेमकं काय होतंय याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, धनंजय मुंडे (Dhanajay Munde) यांच्यावर आरोपांची मालिका सुरु असतानाच त्यांना नवीन रोगाची लागण झाल्याचे त्यांनी सांगितले आहे. पाल्सी (Palsy) हे या रोगाचे नाव असून ह्या आजाराने सध्या धनंजय मुंडे ग्रस्त आहेत. या आजरासाठी ते पुढील उपचार घेत आहेत. त्यामुळे त्यानां सतत उभेही राहता येत नाही. अशातच आता आजच्या सुनावणीकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.