Dhananjay Munde Resignation: राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे(Dhananjay Munde Resignation) यांनी राजीनामा दिलाया. तर एकीकडे नैतिकतेवर राजीनामा दिल्याचं म्हटलं जातंय, अन् दुसरीकडे वैद्यकीय कारण मुंडेंनी दिलंय. यातून मोठा विरोधाभास पाहायला मिळतोय असे विरोधी पक्ष नेत्यांची प्रतिक्रिया आहे. त्याचबरोबर वाल्मिक कराडला फासावर लट्कवण्याची देखील मागणी केली आहे. त्याचबरोबर धनंजय मुंडे यांना सहआरोपी घोषित करण्याची मागणी केली जात आहे.
मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यानंतर जितेंद्र आव्हाडांची प्रतिक्रिया :
राष्ट्रवादी नेते जितेंद्र आव्हाड यांनी धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यानंतर प्रतिक्रिया दिली असून हा सगळा कारभार जातीचा वापर करून केला आहे. पण अशा प्रयत्नांमध्ये कोणीही यशस्वी होऊ शकत नाही. घटनाक्रम बघाल तर नागपूर अधिवेशनापूर्वीच सरपंच संतोष देखमुखांची हत्या झाली होती आणि याचे सर्व पुरावे व माहिती सरकारकडे असताना मुंडेंचा राजीनामा का घेतला नाही? असा सवाल जितेंद्र आव्हाडांनी केला. त्याचबरोबर मी दगड आणला, कारण सरकारला पाझर फुटुत नव्हता. ज्या जातीचा धनजय मुडे आहे त्याच जातीचा मी आहे. मग अशी क्रूरता ज्या माणसात आहे तो पासून कसा असू शकतो. हे सर्व झालं जी अवादा कंपनीच्या खंडणीसाठी. यात वाल्मिक कराड आणि धनंजय मुडे यांचे संबघ निश्चितच आहेत.
आदित्य ठाकरे आक्रमक :
धनंजय मुंडें गाडीत बसून उपमुख्यमंत्र्यांच्या घरी जातात. त्यांच्यात बैठकी होतात. मग मुख्यमंत्र्यांना कळत नाही? मुख्यमंत्री त्यांना बोलवून घेऊ शकत नाहीत का? राज्याचं राजकारण गेल्या काही दिवसांपासून घाणेरडे झालं आहे. सरपंचाला सांगतात फंड देणार नाही. तुम्हाला अधिकार देणार नाही. एका सरपंचाला तुम्ही न्याय देऊ शकत नाहीत तर अशा सरकारला बरखास्त केले पाहिजे. अशी आक्रमक भूमिका आदित्य ठाकरेंनी मांडली. त्याचबरोबर सुधारित चार्जशीट दाखल करा, धनंजय मुंडेंना सहआरोपी करा, सरकार बरखास्त करा अशा मागण्या देखील आदित्य ठाकरेंनी केल्या आहेत.
संदीप क्षीरसागर काय म्हणाले?
राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) गटाचे आमदार संदीप क्षीरसागर म्हणाले, हे फोटो व्हायरल झाल्यानंतर आमच्या जिल्ह्यामध्ये परिस्थिती गंभीर आहे. लोकांनी जेव्हा हे फोटो सोशल मीडिया वरती बघितले त्यानंतर आज पूर्ण जिल्हा आमचा बंद आहे. लोकांच्या भावना ह्या तीव्र झाल्या आहेत. खंडणी प्रकरणात जर सातपुड्यावर मीटिंग झाली असेल हे सुरेश धस जे बोलले आहेत .ते पुरावे असल्याशिवाय बोलणार नाहीत .तसं असेल तर धनंजय मुंडेंना सह आरोपी करायला हवं. सर्वच सभागृहांमध्ये या विषयावरती बोलले जात आहे. सरकारने देखील या प्रकरणाची दखल घेतली आहे. सीआयडी ची चौकशी सुरु झाल्यानंतर जे काही कालपर्यंत तपासा आम्ही बघितला त्यानंतर वाल्मीक कराडला फाशी दिली पाहिजे असे क्षीरसागर म्हणाले.
हे ही वाचा:
Skin Care: पिंपल्सच्या समस्येपासून सुटकारा; गुलाब पाण्यात मिसळा ‘या’ गोष्टी