Sambhaji Bhide: शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संस्थेचे प्रमुख संभाजी भिडे अर्थात भिडे गुरुजी यांनी मराठ्यांच्या आरक्षणाविषयी माध्यमांशी संवाद साधताना, आताचं शासन हे त्रिमूर्ती सरकार आहे. त्यामुळे त्यांची बुद्धी चळणार नाही याची खात्री मला आहे. ती विकृत होणार नाही, याची देखील खात्री मला असल्याची प्रतिक्रिया संभाजी भिडे यांनी दिलीय. धनंजय मुंडे (Dhananjay Munde Resignation) जे काही वागत आहे ते दुर्दैवी आहे. त्यांनी शहाजी महाराज, जिजाऊ मासाहेब, छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज या महापुरुषांचे जीवन चरित्र, मराठ्यांचा इतिहास वाचावा. देशाला राष्ट्र म्हणून टिकवायचे असेल तर पहिल्यांदा मराठ्यांचा इतिहास दहावी पर्यंत सक्तीचा केला पाहजेल. संस्कृत भाषा सक्तीची केली पाहीजे, आणि हे करत असताना शासनही तसं पाहिजे. “महाराष्ट्र मेला, तरी राष्ट्र मेले। मराठ्यांविना, राष्ट्र गाडा न चाले।।” असं म्हणत संभाजी भिडे म्हणाले, “अरे, मराठेसुद्धा स्वतःला संकुचित करून घेत आहेत. आम्हाला आरक्षण हवं. मराठ्यांनी आरक्षण मागायचं नाही. मराठ्यांनी देश चालवायचा आहे. सबंध देशाचा संसार चालवण्याची जबाबदारी असणारा समाज जर कुठला असेल, तर तो महाराष्ट्रात मराठा समाज आहे. पण मराठ्यांना आपण कोण आहोत, हे कळत नाहीये, हे दुर्दैव आहे. मराठ्यांना आपण कोण आहोत? हे जर समजलं, तर देशाचे कोट कल्याण व्हायला दोन दिवस लागणार नहीत.”
सांगली महापालिका क्षेत्रातील घरपट्टीचा विषयात संभाजी भिडे यांनी उडी घेत भाष्य केलं आहे. घरपट्टी का वाढली हे आधी स्पष्ट करायला हवे. महानगरपालिका घरपट्टीची वाढ प्रचंड झाली आहे सर्व कुटुंबात अस्वस्थता तयार झाली आहे. वाढ करणारे काही शत्रू नाहीत घरपट्टी का वाढली याच्यावर विचार मंथन होणे गरजेचे आहे. ही अस्वस्थता घरपट्टी पुरती नसून अनेक विषयात आहे. या अनेक विषयांमुळे महाराष्ट्र अस्वस्थ आहे. राज्यात लोकशाही आहे लोकप्रतिनिधी चांगले आहेत पण अस्वस्थता आहे. या महानगरपालिकेतील घरपट्टी वाढीचे सूत्रधार आहेत. त्यांनी प्रत्येक मतदारसंघात एक स्वातंत्र्य बैठक घेऊन घरपट्टी वाढ का केली हे सांगितले पाहिजे. आयुक्त खूप दिवसांनी चांगले मिळाले आहेत. निष्कलंक, चांगले कार्यकर्तृत्व, लोकांकल्यानाची हवं असणारे आयुक्त आहे. ७८ ठिकाणी तातडीने चार दिवसात सभा झाले पाहिजेत पक्षीय भूत बाजूला फेकून सभा घेतल्या पाहिजेत यामुळे संताप शांत होईल. याला राजकीय वळण येणार नाही याची दक्षता घेतली पाहिजे. पिंडवरचा कावळा अशी राजकीय लोकांची भूमिका असतें
बलात्कार हा सत्ताधारी आणि विरोधकांनाही नकोय. बलात्कार विषयावर विधानसभेचा वेळ वाया घालवू नये, बलात्काऱ्याला जिथे घावेल तिथं ठार मारा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, एकनाथ शिंदे यांनी या बाबीची गंभीर दखल घेतली पाहिजे, असे म्हणत संभाजी भिडे यांनी राज्यातील वाढत्या बलात्काराच्या घटनांवर भाष्य करत आक्रमक भूमिका मांडली आहे.
यांसारख्या अनेक मुद्द्यांवर संभाजी भिडे यांनी माध्यमांशी बोलताना आपले मत मांडले आहे. शेरीनाला हे भूत महापालिकेच्या मानगुटीवर अन्वकवर्षे बसलेला आहे. कावीळ सारखे अनेक आजार होतायत. रोगराई पसरत आहे. एखादा चांगला लोकप्रतिधी च्या हातात विषय दिला असता तर त्याने सोडवला असता. त्याचप्रमाणे देशात दारू विक्री बंद केली पाहिजे. अंमली पदार्थ सुशिक्षित समाजात चालू दिले नाही पाहिजे. श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान चांगले काम करणार आहे जे देशात उदाहरणं होईल
चित्रपटाचा परिणाम हा तात्कालिक असतो. संभाजी महाराजांच्या प्रेरनेने असंख्य तरुण निर्माण केले पाहिजे. हा दुःखाचा महिना आहे. संभाजी महाराजांचे बलिदान हे देशाला जोडलेला आहे. या बलिदान मधून देशाचा शत्रू इस्लाम गेला विश्वाच्या संघर्षातून शिवाजी महाराज, संभाजी महाराज यांचे प्रेरणा महत्वाची आहे. अबू आझामी सारखे नेते हे देशाचे एक नंबरचे शत्रू आहेत. असे म्हणत संभाजी भिडे यांनी सर्वच विषयांवर भाष्य केले.
हे ही वाचा:
Santosh Deshmukh Murder: मन विचलित करणारे संतोष देशमुखांच्या हत्येचे फोटोस आले समोर
Dhananjay Munde Resignation: अखेर मुंडेंचा राजीनामा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून आदेश