गेल्या तीन महिन्यांपासून सुरु असलेल्या संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा अखेर आज छडा लागला. संतोष देशमुख हत्या प्रकरणाचे सोमवारी समाज माध्यमांवर व्हायरल झालेल्या हत्येचे अमानुष फोटो आणि व्हिडीओने राज्यभरात संतापाची लाट उसळली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा स्वीकारून तो राज्यपालांकडे पुढील कारवाईसाठी पाठवला आहे. अशातच पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी प्रसारमाध्यमांना या प्रकरणाबाबत प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
पंकजा मुंडे म्हणाले की, “काल काही व्हिडिओज सोशल मीडिया वरती व्हायरल झाले होते, संतोष देशमुख यांच्या हत्येचे ते व्हिडिओ होते. ते व्हिडिओ उघडून पाहण्याची सुद्धा माझी हिम्मत झाली नाही. ज्या लोकांनी संतोष देशमुख यांची अमानुषपणे हत्या केली आहे आणि या घटनेचा व्हिडिओ केला आहे. त्या लोकांमध्ये एवढी निर्मनुष्यता आहे हे त्या व्हिडिओतून दिसत आहे. हे व्हिडिओ बघण्याची सुद्धा माझी हिंमत झाली नाही. संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर मी मुख्यमंत्र्यांना पत्र दिलं होतं, त्यात मी माझी भूमिका मांडली होती. या हत्येमध्ये कोण इनवॉल आहे? कोणाकोणाचा हात आहे? हे फक्त तपास यंत्रणांना माहीत आहे.
“मी यात हस्तक्षेप करण्याचा काही संबंध नाही. ज्या मुलांनी ही हत्या केलेली आहे, त्या मुलांमुळे संपूर्ण राज्यातील समाज ज्यांचा कुठलाही दोष नाही, त्यांची बदनामी झाली आहे. संतोष देशमुख यांचा समाजसुद्धा आक्रोशात वावरत आहे. आपल्या राज्यात कुठलीही गोष्ट जातीवर जात जाते. अमानुषपणे एखाद्याला संपवणाऱ्या आणि हल्ला करणाऱ्या लोकांना कुठलीही जात नसते. गुन्हेगारांना जशी कुठली जात नसते तशीच राजकारण्यांना सुद्धा कुठली जात नसते, हे लक्षात ठेवलं पाहिजे. मी आमदारकीची शपथ घेतली, तेव्हाच कोणाबद्दल आक्रोश बाळगणार नाही अशी शपथ घेतली आहे. त्यामुळे याही प्रकरणात कुठलाही जातीवाद होण्याचा प्रयत्न होऊ नये. मी संतोष देशमुख यांच्या आईची आणि कुटुंबीयांची हात जोडून माफी मागते. या प्रकरणातल्या गुन्हेगारांना कडक शिक्षा व्हावी हीच माझी मागणी आहे. धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याचे स्वागत आहे. पण हा राजीनामा फार आधी व्हायला पाहिजे होता. राजीनामा घेणाऱ्यांनी सुद्धा आधीच राजीनामा घ्यायला पाहिजे होता, अशी प्रतिक्रिया पंकजा मुंडे यांनी दिली आहे.
हे ही वाचा:
Santosh Deshmukh Murder: मन विचलित करणारे संतोष देशमुखांच्या हत्येचे फोटोस आले समोर
Dhananjay Munde Resignation: अखेर मुंडेंचा राजीनामा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून आदेश