दिवाळीपूर्वी स्टेट बँक ऑफ इंडिया ने भारतीय क्रिकेटपटू आणि माजी क्रिकेट कर्णधार महेंद्र सिंह धोनी ची ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून नियुक्ती केली आहे. सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक म्हणजेच भारतीय स्टेट बँकेने रविवारी महेंद्र सिंह धोनी वर मोठी जबाबदारी दिली आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया महेंद्र सिंह धोनीची अॅम्बॅसेडर म्हणून नियुक्ती जाहीर केली आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाचा ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून एमएस धोनी मार्केटिंग आणि जाहिरातीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावणार आहे.
धोनी स्टेट बँक ऑफ इंडियाचा ब्रँड अॅम्बॅसेडर
स्टेट बँक ऑफ इंडियाचे अध्यक्ष दिनेश खारा यांनी दिलेल्या माहितीनुसार, एसबीआयचा ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून एमएस धोनीचा समावेश करताना आम्हाला खूप आनंद होत आहे. धोनीच्या एसबीआयसोबतच्या सहकार्यामुळे आमच्या ब्रँडला नवी ओळख मिळणार आहे. हा निर्णय एक भागीदारी आहे. आमचा उद्देश विश्वास, सचोटी आणि अटूट समर्पणाने देश आणि आमच्या ग्राहकांची सेवा करण्याची आमची वचनबद्धता आणखी मजबूत करणे हे आहे.
स्टेट बँक ऑफ इंडिया ही मालमत्ता, ठेवी, शाखा, ग्राहक आणि कर्मचारी यांच्या बाबतीत सर्वात मोठी व्यावसायिक बँक आहे. एसबीआय बँक देशातील सर्वात मोठा कर्जदाता आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाने आतापर्यंत 30 लाखाहून अधिक भारतीय कुटुंबांची घर खरेदीची स्वप्ने पूर्ण केली आहेत. बँकेचा गृह कर्ज पोर्टफोलिओ 6.53 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे.
हे ही वाचा :
‘बिग बॉस’च्या घरात अंकिता लोखंडे आणि विकी जैनमध्ये वाद
संजय राऊत यांचा मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल, मुख्यमंत्री भाजपची भांडी घासतात…