राज्यातल्या भाजप सरकारच्या धडाकेबाज सौर ऊर्जा धोरणांमुळे महाराष्ट्रातील घरगुती विजेचे दर भविष्यात घटणार आहेत. कारण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येत असलेल्या “मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी २.०” योजनेमुळे शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा तर होणारच, पण घरगुती आणि औद्योगिक ग्राहकांसाठीही ही योजना क्रांतिकारी ठरणार असल्याचा दावा महावितरणचे स्वतंत्र संचालक आणि प्रदेश भाजपचे सह मुख्य प्रवक्ते विश्वास पाठक यांनी शुक्रवारी येथे पत्रकारांशी बोलताना केला.
महावितरणने घरगुती विजेच्या दरांत मोठी घट करण्याचा प्रस्ताव राज्य वीज नियामक आयोगासमोर ठेवला असून या प्रस्तावानुसार, १०० युनिटपर्यंत वीज वापरणाऱ्या ग्राहकांसाठी दर ५.८७ रुपये प्रति युनिट, तर १०१ ते ३०० युनिट वापर करणाऱ्यांसाठी दर ११.८२ रुपये प्रति युनिटपर्यंत कमी केले जाणार आहेत. कारण सौर ऊर्जा प्रकल्पांच्या माध्यमातून भाजप सरकारने विजेच्या दरात घट करण्याचे आश्वासन पूर्ण करण्याचा निर्णायक पाऊल उचलल्याची माहितीही पाठक यांनी दिली.
पाठक म्हणाले की, मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी २.० योजनेद्वारे राज्यात आगामी दोन वर्षांत १६ हजार मेगावॅट सौर ऊर्जा निर्मिती होणार असल्याने निश्चितच वीज उत्पादनाच्या खर्चात घट होईल, आणि महावितरणचा सरासरी वीज खरेदी खर्चही २३ टक्क्यांवरून १२ टक्क्यांपर्यंत कमी होईल.
औद्योगिक ग्राहकांना भाजप सरकारने दिलेल्या सर्व प्रोत्साहन योजना आणि सवलती कायम ठेवण्यात येणार असल्याचेही पाठक यांनी नमूद केले. मात्र क्रॉस सबसिडीच्या गरजेमध्ये घट झाल्याने औद्योगिक क्षेत्रालाही दिलासा मिळेल आणि राज्यात औद्योगिक गुंतवणुकीसाठी पोषक वातावरण निर्माण होईल, असाही ठाम विश्वास पाठक यांनी केला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारने सौर ऊर्जा निर्मितीच्या माध्यमातून महाराष्ट्राला आर्थिक आणि पर्यावरणीय दृष्ट्या स्वावलंबी बनवण्याचे लक्ष्य ठेवले आहे. त्यामुळे विश्वास पाठक यांनी दिलेली माहिती ही भाजपच्या वचनपूर्तीची पावती आहे.
विरोधकांनी भाजपच्या सौर ऊर्जा धोरणांवर नेहमीच टीका केली आहे. मात्र, या घोषणांनी त्यांना चोख उत्तर दिले आहे. भाजप सरकार शेतकरी, घरगुती ग्राहक आणि औद्योगिक क्षेत्राचा सर्वांगीण विकास सुनिश्चित करत असल्याचा विश्वास पाठक व्यक्त करतानाच, भाजपचा ऊर्जा क्षेत्रात आघाडीवर येईल आणि विजेचे दर कमी करून ग्राहकांना मोठा दिलासा मिळेल, असेही पाठक यांनी ठामपणे सांगितले.
-किशोर आपटे
हे ही वाचा :