Republic Day 2025: ७६ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त राज्यभरात कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. अशातच, भारतीय स्वातंत्र्याच्या ७६ व्या प्रजासत्ताक वर्धापन दिनानिमित्त आज नागपुरमध्ये झेंडावंदनानंतर अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले होते. यावेळी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी माध्यमांशी संवाद साधला.
आजच्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृ्त्वाचा विकसित भारत देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील विकसित महाराष्ट्र संकल्पना या देशात आणि महारष्ट्रात होत आहे. खरं तर या डबल इंजिन सरकारच्या माध्यमातून २१ व्या शतकातील विकसित भारत आणि विकसित महाराष्ट्राचा संकल्प केला आहे, विकासयोजनांचा संकल्प केला आहे. दोन्ही सरकारच्या माध्यमातून योजना लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी शासन व प्रशासन म्हणून काम करणार आहोत. आजचा दिवस सर्वांसाठी आनंदाचा दिवस आहे. सर्व भारतीय आज आनंदोत्सव साजरा करत आहेत. आपण सर्व नरेंद्र मोदींच्या संकल्पनेला साथ देऊया, विकसित भारताचे त्यांचे स्वप्न पू्र्ण करुया, अशा शब्दांत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रजासत्ताक दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या.
प्रजासत्ताक दिनी दिल्ली बनली अभेद्य किल्ला
नवी दिल्लीत 7000 हून अधिक सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. त्यापैकी 1000 हून अधिक कॅमेरे केवळ परेड मार्गावर लक्ष ठेवत असून या कॅमेऱ्यांमध्ये फेस रेकग्निशन सिस्टीम (एफआरएस) वापरण्यात येत असून त्यामुळे संशयित गुन्हेगार आणि दहशतवादी ओळखण्यास मदत होणार आहे. प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमाला येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला हाय डेफिनेशन कॅमेऱ्यांच्या नजरेतून जावे लागले. डेटाबेसशी कोणाचाही चेहरा जुळल्यास तत्काळ अलार्म वाजवून संबंधित सुरक्षा कर्मचाऱ्यांना माहिती दिली गेली. प्रजासत्ताक दिनानिमित्त कोणत्याही प्रकारचे हवाई हल्ले होऊ नयेत यासाठी विमानविरोधी तोफा आणि ड्रोनविरोधी यंत्रणा बसवण्यात आली होती. 25 जानेवारीच्या रात्रीपासून 100 हून अधिक स्नायपर उंच इमारतींवर तैनात केले आहेत. ल्युटियन झोनमध्ये 10 ठिकाणी विमानविरोधी तोफा तैनात करण्यात आल्या आहेत. याशिवाय बॉम्ब शोधक पथक, स्वाट कमांडो, क्विक रिस्पॉन्स टीम (क्यूआरटी) आणि श्वान पथकही परेड मार्ग आणि व्हीव्हीआयपी भागात तैनात करण्यात आले आहेत.
हे ही वाचा :
महाराष्ट्रातील तिघांना पद्म पुरस्कार जाहीर; कसा मिळतो पद्म पुरस्कार?