कल्याण लोकसभा मतदारसंघातील शहरांमध्ये पायाभूत सुविधांची उभारणी करण्याबरोबरच शहर सुशोभीकरण, शिक्षण, आरोग्य, धार्मिक स्थळांचा विकास यांसारखे अनेक प्रकल्प खासदार डॉ.श्रीकांत शिंदे त्यांच्यामुळे मार्गी लागले आहेत. याच पार्श्वभूमीवर आज म्हणजे १५ फेब्रुवारी रोजी अंबरनाथ येथे विविध विकासप्रकल्पांची उभारणी करण्यात येत आहे. याच विकास कामांचा आज पाहणी करून डॉ.श्रीकांत शिंदे यांनी आढावा घेतला. यावेळी सर्व विकासकामे जलदगतीने पूर्ण करण्याच्या सूचना पालिकेच्या सर्व विभागाच्या संबंधीत अधिकाऱ्यांना दिल्या.
या कामांची केली पाहणी : –
- अंबरनाथ शहराची ओळख असलेल्या आणि सुमारे ९०० वर्षांहून अधिक प्राचीन असलेल्या शिवमंदिराला जागतिक स्तरावर ओळख मिळवून देणारा सुमारे १४० कोटी रुपयांच्या निधीतून ” शिवमंदिर परिसर सुशोभीकरण प्रकल्प ” राबविण्यात येत आहे. याप्रकल्पाच्या अंतर्गत काशी कॉरिडॉरच्या धर्तीवर भव्य प्रवेशद्वार, संपूर्ण सुशोभीकरण प्रकल्प काळ्या पाषाणात केला जाणार असून वाहनतळ, प्रदर्शन केंद्र, प्रवेशद्वारसमोरील चौकात नंदी, संरक्षक भिंत, चेक डॅम भक्त निवास आणि भव्य घाट यांची उभारणी करण्यात येणार आहे. यातील भव्य घाट उभारणीचे काम जलदगतीने सुरु आहे. यामुळे भविष्यात मंदिराला भेट देणाऱ्या भाविकांना काशी, वाराणसी प्रमाणेच घाट आरतीचा अनुभव घेता येणार आहे. प्राचीन कुंडाचे काम पूर्ण होत आले आहे. भक्तनिवासाचे काम सुरु झाले आहे. लवकरच या प्रकल्पाचे काम पूर्ण होऊन पूर्ण होऊन या शहराचे रूप पालटणार आहे.
- अंबरनाथ पश्चिम येथील सर्कस मैदान येथे ३८.७१ कोटी रुपयांच्या निधीतून प्रशस्त असे नाट्यगृह उभारण्यात येत आहे. या नाट्यगृहाचे काम जवळपास पूर्ण झाले आहे. येत्या १ मे रोजी नाट्यगृहाचे लोकार्पण होणार असून लवकरच अंबरनाथ आणि आसपासच्या शहरातील नागरिकांना विविध नाटक आणि सांस्कृतिक कार्यक्रमाची पर्वणी अनुभवता येणार आहे.
- अंबरनाथ पश्चिम येथील नेताजी मार्केट परिसरात सुमारे १० कोटी रुपयांच्या निधीतून स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स उभारण्यात येत आहे. याकामाची ही यावेळी पाहणी करून उत्तम दर्जाचे काम व्हावे यासाठी विविध सूचना केल्या. तर याचे काम हे ” व्हर्टिकल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स ” या संकल्पनेतून उभारण्यात येणार आहे. यामुळे एकाच छताखाली खेळाडूंना विविध खेळ खेळता येणार आहे.
- शहरातील कैलासनगर येथील लोकल बोर्ड शाळा क्रमांक १ आणि स्वामी नगर शाळा क्रमांक ११ या दोन्ही शाळांची अत्यंत जीर्ण झालेली इमारत तोडून लोकल बोर्ड शाळा क्रमांक १ येथे दोन्ही शाळांची एकत्रितरित्या इमारत बांधण्यात येत आहे. यामुळे विद्यार्थ्यांना प्रशस्त आणि विविध सुविधांनी युक्त अशी नवीन शालेय इमारत उपलब्ध होणार आहे.
यावेळी शिवसेनेचे स्थानिक लोकप्रतिनिधी, पदाधिकारी यांच्यासमवेत अंबरनाथ नगरपालिकेचे सर्व वरिष्ठ अधिकारी आणि संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.हे ही वाचा:
WCD Maharashtra Recruitment: मंत्री आदिती तटकरेंची मोठी घोषणा, महिला-बालविकास’मध्ये पदभरती
Follow Us
टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.