Saturday, June 3, 2023

Latest Posts

Nagpur मधील चार मंदिरांमध्ये वस्त्र संहिता लागू, तोकडे कपडे बॅन!

नागपुरातील (Nagpur) चार मंदिरांमध्ये वस्त्र संहिता म्हणजेच ड्रेस कोड लागू करण्यात आला आहे.

गेल्या काही दिवसांपासून राज्यात मंदिरावरून अनेक वाद हे होते आहेत. मंदिरात तोकडे कपडे घालावे कि नाही यावरून हा वाद सध्या सुरु आहे. नुकतंच काही दिवसांपूर्वी तुळजापूरच्या (Tuljapur) तुळजाभवानी मंदिरातील ड्रेसकोडच्या (Dress Code) फलकावरुन मोठा वाद निर्माण झाला होता. त्यातच आता महाराष्ट्र मंदिर महासंघाने एक मोठी घोषणा केली आहे. नागपुरातील (Nagpur) चार मंदिरांमध्ये वस्त्र संहिता म्हणजेच ड्रेस कोड लागू करण्यात आला आहे.

नागपुरामधील ४ मंदिरांमध्ये वस्त्र संहिता लागू करण्यात आला आहे. तर महाराष्ट्रातील मंदिरांमध्ये वस्त्र संहिता लागू झाली पाहिजे, अशी मागणी महाराष्ट्र मंदिर महासंघाने केली आहे. तसेच पहिल्या महिन्यात नागपुरमधील २५ तर राज्यभरातील ३०० हून अधिक मंदिरांमध्ये ही वस्त्र संहिता लागू करण्यात येणार आहे असे महाराष्ट्र मंदिर महासंघाने म्हटले आहे. तसेच नागपूरमधील गोपाळ कृष्ण मंदिर, धनतोली, संकटमोचन पंचमुख हनुमान मंदिर, बेलोरी, ब्रहस्पती मंदिर, कोन्होलीबारा, दुर्गामाता मंदिर, हिलटॉप या मंदिरात वस्त्रसंहिता लागू करण्यात आली आहे.

 

तर दुसरीकडे देशातील अनेक मोठमोठ्या मंदिरांमध्ये आधीच वस्त्र संहिता ही लागू करण्यात आली आहे. त्यामुळे पुढील काही दिवसात सर्व मंदिरात ती लागू व्हावी अशी आमची भूमिका आहे. महाराष्ट्र मंदिर महासंघाची नागपुरात पत्रकार परिषद झाली. तसेच जर कोणी मंदिरात येताना अशोभनीय, तोकडे कपडे घालून आले तर त्याला परत पाठवण्याऐवजी मंदिराच्या प्रवेशद्वारावर शॉल, ओढणी, धोतर असे कपडे देण्यात येणार आहे. तसेच भाविकांना ते कपडे वापरून मंदिरात प्रवेश करता येणार आहे. तसेच हे नियम फक्त महिलांसाठीच नाही तर पुरुषांसाठी देखील लागू होणार आहेत असं देखील सांगण्यात आलं आहे. तसेच पहिल्या महिन्यात नागपुरातील २५ तर राज्यभरातील ३०० मंदिरांमध्ये ही वस्त्र संहिता लागू करण्याचे प्रयत्न आहेत. राज्य सरकारची देखील सरकारी कार्यालयांसाठी वस्त्र संहिता आहे. मग मंदिरासाठी का नको? असा सवाल देखील या वेळी उपस्थित करण्यात आला.

हे ही वाचा:

Arvind Kejriwal आले विरोधकांना जोडण्यासाठी, आज घेणार शरद पवारांची भेट

पुण्यात टिंबर मार्केटमध्ये अग्नितांडव, अग्निशमन दलाच्या ३० गाड्या घटनास्थळी

अवघ्या काही तासांत लागणार HSC चा निकाल, विद्यार्थ्यांची उत्सुकता शिगेला

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss