महाराष्ट्राचे कुलदैवत असणाऱ्या श्री क्षेत्र खंडोबा देवाच्या दर्शनासाठी जेजुरी गडावर येणाऱ्या भाविकांसाठी आजपासून वस्त्र संहिता लागू करण्याचा निर्णय देवस्थान ट्रस्टने घेतला असून तसेच त्यासाठी नियमावलीही जाहीर करण्यात आली आहे. यापुढे मंदिरात दर्शनासाठी भारतीय वेशभूषा परिधान करणे आवश्यक असेल. भारतीय वेशभूषा असेल तरच भाविकांना प्रवेश मिळेल असा निर्णय श्री मार्तंड देव संस्थान, जेजुरीच्या विश्वस्त मंडळाच्या वतीने घेण्यात आला आहे. पुरूष व महिला भाविकांना मंदिरांत कमी कपड्यांमध्ये प्रवेश मिळणार नाही, असंही स्पष्ट करण्यात आले आहे.
फॅशन म्हणून वापरण्यात येणाऱ्या फाटक्या जीन्स, बरमुडा, शॉर्ट, स्कर्ट असा व तत्सम कपडे घालून देव दर्शनास गडावर येण्यास मज्जाव केला जाणार आहे. याविषयी बोलताना श्री मार्तंड देवस्थानचे विश्वस्त मंगेश घोणे म्हणाले की, “मंदिराची पावित्र्य, शालीनता जपणारी वेशभूषा भाविकांकडून अपेक्षित आहे. गुडघ्याच्या वरती असणारे किंवा आखूड-कमी कपडे अपेक्षित नाहीत. असे कपडे न घालण्याचं नम्र आवाहन सर्व विश्वस्त मंडळाच्या वतीने भाविकांना करण्यात आले आहे. महिला आणि पुरुष दोघांसाठी हे नियम सारखेच असणार आहेत. दरम्यान दर्शनासाठी येताना भाविकांनी कोणत्याही प्रकारचे भारतीय पारंपरिक वेशभूषा केलेली चालणार आहे.
जेजुरीचा खंडोबा हे लाखो भाविकांचे श्रद्धास्थान आहे. गडावर दररोज हजारो भाविकांची गर्दी पहायला मिळते. त्यात अनेक जणांचा पेहराव हा आपल्या भारतीय संस्कृतीला शोभणारा नसतो. काहीजण गडाच्या परिसरामध्ये असणाऱ्या बागेत विचित्र पद्धतीने वागताना यापूर्वी आढळले आहेत. मात्र देवस्थानच्या कर्मचाऱ्यांनी त्यांना समज देऊन सोडून दिले. खंडोबा गड हा उंच डोंगरामध्ये असल्यामुळे अनेक पर्यटकही येथे येतात. पर्यटनाबरोबर खंडोबाचे दर्शन त्यांना घडते. मात्र त्यांना सुद्धा आता हे नियम काटेकोरपणे पाळावे लागतील.
हे ही वाचा :
Uddhav Thackeray आणि Eknath Shinde आमने सामने येताच; कहीं पे निगाहें कहीं पे निशाना…
Maharashtra Budget 2025: यंदाच्या अर्थसंकल्पाने बळीराजाला काय काय दिले?
Follow Us