राज्यातील काही भागात मागील काही दिवसांपासून खूप कमी प्रमाणत पाऊस पडत आहे. त्यामुळे काही भागात दुष्काळग्रस्त परिस्थिती निर्माण झाली आहे. काही भागातील खरिपाची पीक वाया गेली आहेत. अशीच गंभीर परिस्थिती मराठवाड्यात देखील निर्माण झाली आहे. कमी प्रमाणात पडलेल्या पावसाचा फटका शेती पिकांना मोठ्या प्रमाणावर बसला आहे. त्यामुळे मराठवाड्यात दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी छावा संधटनेमार्फत करण्यात येत आहे. या मागणीनंतर छावा संघटनेच्या वतीनं मंत्री संजय बनसोडेंच्या (Minister Sanjay Bansode) घरासमोर ठिय्या आंदोलन करण्यात येणार आहे.
छत्रपती संभाजी नगरमध्ये झालेल्या बैठकीत मराठवाड्या बाबत कोणताही निधी देण्यात आला नाही. जिह्ल्यातील काही भागात कमी पाऊस पडल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. शिवारात पण नाही, त्यामुळे सरकारने याचा गांभीर्याने विचार करावा अशी मागणी छावा संधटनेमार्फत करण्यात येत आहे. मंत्री संजय बनसोडे हे धवजरोहण करून घराबाहेर निघाले होते तेव्हा छावा संघटनेच्या नेत्यांनी त्याच्या घरासमोर ठिय्या आंदोलन करण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी छावा संघटनेच्या नेत्याशी संवाद साधला. विरोधी पक्षाकडून देखील मराठवाड्यात दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी करण्यात आली होती. या वर्षी राज्यात कमी प्रमाणात पाऊस पडल्यामुळे सगळीकडे पाण्याचा प्रश्न उप्लब्ध झाला आहे. खरिपाच्या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. जिह्ल्यात सरासरी कमी पावसाची नोंद करण्यात आली. मराठवाड्यासह पश्चिम महाराष्ट्रामध्ये देखील पिण्याचा पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. कोकणात काही प्रमाणात पावसाने हजेरी लावली आहे. तर काही भागात पावसाने दांडी मारली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. खरिपाची पीक वाचवण्यासाठी राज्यात अजूनही शेतकरी चांगल्या पावसाची वाट पाहत आहेत.
शेतकऱ्यांच्या पिकांना पाण्याविना खूप मोठा फटका बसला आहे. तूर, सोयाबीन, मका, कांदा, फळबागा इत्यादी पिकांचं मोठं नुकसान झालं आहे.ऑगस्ट महिन्यात कमी प्रमाणात पाऊस पडल्यानंतर आता सप्टेंबरमध्ये पावसाने चांगलीच हजेरी लावली आहे. चांगल्या प्रमाणात पाऊस पडला तर शेती पिकांचे होणारे नुकसान टाळू शकेल.
हे ही वाचा:
मध्य प्रदेशात मुसळधार पाऊस, काही भागात जनजीवन विस्कळीत
कोकणात जाणाऱ्या रेल्वे गाड्या तब्बल ६ तास उशिरा