spot_img
Sunday, February 9, 2025

Latest Posts

टक्कल पडल्याने मुलं- मुलींचे लग्न जुळेनात, पाहुणाही येत नाही

बुलढाणा जिल्यातील काही गावात लोकांना अचानक टक्कल पडायला सुरवात झाली आहे. आरोग्यविषयक समस्या निर्माण झाल्यानंतर त्याचे आता सामाजिक परिणामही समोर येत आहे. या गावातील अचानक टक्कल पडल्याने मुलं मुलींचे लग्न जुळेनात, या गावात पाहुणाही येत नाही. तसेच या गावात आता बाहेरून येणारा भाजीपाला आणि दुधाचा पुरवठा बंद झाला आहे. इतकंच काय तर या गावांतील लोकांना इतर गावांमध्ये प्रवेश दिला जात नाही, त्या गावातील सलूनमध्येही प्रवेश दिला जात नसल्याचं समोर आलं आहे.

शेगाव तालुक्यातील तब्बल १५ ते १६ गावात अचानक केस गळती सुरु झाली, अनेकांना टक्कल पडलं. अनेक वैधकीय पथके या भागात केस गळतीचा शोध घेण्यासाठी येऊन गेली. या टक्कल पाडण्यामागच्या कारणांचा शोध वीस दिवस उलटनही अद्याप लागलेला नाही. या गावातील व या परिसरातील नागरिकांकडे इतर परिसरातील लोक वेगळ्याच नजरेने बघायला लागले आहेत.

लग्नाळू मुला-मुलींचे विवाह थांबले

टक्कल पडत असल्याच्या कारणाने परिसरात कुणी नवीन पाहुणाही येत नाही आहे. ग्रस्त परिसरातील नागरिकांना इतर गावात कुणाला येऊ देत नाही आहे. लग्न ठरलेले असूनही पाहुणे सुद्धा काही कारणाने या गावात यायचं रद्द कायाला लागले आहे. मुलांना- मुलींना लग्नासाठी स्थळही येईना असं चित्र आहे.

गावातील लोकांना सलूनमध्ये बंदी

या परिसरातील नागरिकांना सलूनमध्ये सुद्धा प्रवेश दिला जात नाही. त्यामुळे या परिसरातील नागरिकांना मोठ्या समस्यांचा सामना करावा लागत आहे. शासनाने लवकरात लवकर या आजाराचे निदान करून यावर तात्काळ औषध उपचार करावा आणि या परिस्थितीतून बाहेर काढावं अशी मागणी या परिसरातील नागरिक आता करत आहेत.

ICMR चं पथक दाखल

बुलढाण्याच्या शेगावातील केस गळती आणि टक्कल पडण्याच्या कारणांचा शोध घेण्यासाठी ICMR चं पथक दाखल झालं आहे. या पथकामध्ये आठ जणांचा समावेश आहे. दिल्ली, चेन्नई, भोपाळ येथील ICMR च्या डॉक्टरांचा यामध्ये समावेश आहे. या आयुष पथकाने दोन दिवस या भागातील आठ गावांचा दौरा केला. परंतु अजूनही केस गळतीचं निदान करता आलेलं नाही.

हे ही वाचा:

अजितदादा….दोषींना शिक्षा देण्यात सरकार अपूर्ण पडले तर…काय म्हणाले Rohit Pawar?

Central Railway चा खोळंबा; उशिराने धावणाऱ्या लोकलमुळे स्थानकांवर प्रवाशांची गर्दी

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss