यंदा पावसाने दरवर्षीप्रमाणे सरासरी गाठलेली नाही. राज्यातील अनेक धरणं यामुळे भरले नाही.राज्यात कमी पाऊस झाल्याचा फटका आतापासून दिसू लागला आहे. राज्यातील धरणांमध्ये पाण्याचा जलसाठा अपूर्ण आहे, ज्यामुळे पाण्यावरुन दोन जिल्ह्यांत आता वाद सुरु झालेला आहे. यामुळे पुढील वर्षी जुलै महिन्यांपर्यंत पाण्याचा वापर संपूर्ण राज्यभर काटकसरीने करावा लागणार आहे. धरणातील पाण्यासाठी पहिले आरक्षण पिण्याच्या पाण्याचे आहे. त्यानंतर शेतीकामासाठी पाणी देण्यात येणार असून, यंदा खरीप हंगाम इतका समाधानकारक झालेलं दिसून आलं नाही. यामुळे आता रब्बी हंगामासाठी धरणातून पाणी मिळण्याची अपेक्षा शेतकरी करत आहेत. परंतु आता राज्यातील दोन जिल्ह्यात या पाण्यावरुन वाद सुरु झालेला आहे. नाशिक आणि अहमदनगर जिल्ह्यातील असणारं पाणी छत्रपती संभाजीनगर येथील जायकवाडी प्रकल्पात सोडण्यास नाशिक आणि अहमदनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी विरोध केला आहे. यामुळे ऐन दिवाळीच्या तोंडावर पाणीप्रश्न पेटणार आहे.
अहमदनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा जायकवाडी धरणात पाणी सोडण्यास विरोध
अहमदनगर जिल्ह्यातील धरणातून संभाजीनगरच्या जायकवाडी धरणात पाणी सोडण्यास राजकीय नेत्यांसह शेतकऱ्यांनी देखील विरोध केला आहे. समन्यायी पाणी वाटप कायद्याचा आधार घेत अहमदनगर आणि नाशिकमधील पाणी मराठवाड्यातील जायकवाडी धरणात सोडण्याचा आदेश देण्यात आलाय. जवळपास साडेआठ टिएमसी TMC इतकं पाणी सोडण्यात येणार आहे. परंतु या निर्णयाला नाशिक आणि अहमदनगर जिल्ह्यातून कडाडून विरोध होत आहे.जायकवाडी प्रकल्पासाठी पाणी सोडलं गेलं तर नगर नाशिकमधील शेतकरी संकटात सापडतील असे या दोन्ही जिल्ह्यातील जिल्ह्यातील राजकीय नेत्यांनी म्हटले आहे.
अहमदनगरमधील निळवंडे धरणातून दुष्काळग्रस्त भागात सोडण्यात आलेले पाणी अद्याप अनेक गावात न पोहचल्याने या गावा परिसरातील शेतकरी संतप्त झालेले आहे. तसेच जायकवाडी प्रकल्पासाठी पाणी सोडणार असल्याने शेतकरी हवालदिल झाले असून, जायकवाडीला पाणी सोडणार असल्यामुळे खासदार सदाशिव लोखंडे यांनी शिर्डीत या सगळ्याबाबत एक बैठक घेतली. या बैठकीत अहमदनगरमधील पाणी जायकवाडीला सोडण्याच्या निर्णयाला सगळ्यांकडून जाहीर विरोध करण्यात आला.
हे ही वाचा :
पुढील ४८ तासात महाराष्ट्रासह देशभरात पाऊस; हवामान विभागाची माहिती
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज संभाजीनगर दौऱ्यावर, जरांगे यांची भेट घेणार?