spot_img
Monday, January 20, 2025

Latest Posts

पुण्यात डंपरने ९ जणांना चिरडले, तिघांचा मृत्यू , चालक मद्यधुंद अवस्थेत…

पुण्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. पुण्यात एका डंपरने ९ जणांना चिरडले. ही घटना वाघोली केसनंद परिसरात घडली. पुण्यात काम शोधण्यासाठी अमरावतीवरून आले होते. अमरावतीवरून आलेल्या या कामगारांनी फुटपाथवर आसरा घेतला होता. कामगार झोपले असता भरधाव वेगाने आलेल्या डंपरने ९ जणांना चिरडले. यामध्ये ३ जणांचा मृत्यू झाला आहे तर ६ जण गंभीर जखमी झाले आहे. जखमीमधील तिघांची प्रकृती चिंताजनक आहे. ही घटना रात्री 12.30 वाजण्याच्या सुमारास पुण्यातील वाघोलीतील केसनंद फाटा येथे घडली. डंपर चालक मद्यधुंद अवस्थेत होता, अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे. मृतांमध्ये एक आणि दोन वर्षाच्या चिमुकलनाचा समावेश आहे. पोलिसांनी तात्काळ डंपर चालकाला अटक केली आहे. जर तो डंपर दुसऱ्या बाजुला वळला असता तर आणखी 15-16 जणांचा बळी गेला असता, घटनास्थळी असलेल्यांनी आरडाओरड केली आणि डंपर दुसऱ्या बाजुला घालायला सांगितलं मात्र, त्यामध्ये अनेक जण जखमी झाले आहेत. असं घटनेच्यावेळी असलेल्या प्रत्यक्षदर्शीने माहिती दिली आहे.

नेमकं काय घडलं?
अमरावतीवरून पुण्यात काम शोधण्यासाठी आलेल्या कामगारांनी फुटपाथवर आसरा घेतला होता. कामगार झोपले असतांना एका भरधाव डंपरने झोपलेल्या ९ जणांना चिरडले. डंपर चालक हा मद्यधुंद अवस्थेत होता. यामध्ये तिघांचा जागेवरच मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये दोन लहान मुलांचा समावेश आहे. तर या अपघातामध्ये सहा जण गंभीर जखमी झाले आहेत. हि घटना रविवारी रात्री बारा ते एक वाजण्याच्या दरम्यान घडली आहे. याप्रकरणी डंपर चालक गजानन शंकर तोट्रे, 26 वर्षे रा. नांदेड याला अटक केली असून त्याच्या विरोधात मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जखमी कामगारांवरती ससून रुग्णालयामध्ये उपचार सुरु आहेत. कामगार अमरावतीवरून पुण्यात कामासाठी आले होते.

घटनेच्यावेळी उपस्तिथ असलेल्या प्रत्यदर्शीने काय सांगितले
या घटनेबाबत प्रत्यक्षदर्शींनी माहिती देताना सांगितलं, आम्ही 40 जण कामासाठी इथे पुण्याते आलो आहोत, इकडे काम भेटतं म्हणून आम्ही अमरावती वरून पुण्याला काल रात्री आलो. आम्ही चार वर्षाआधी पण इथे काम करत होतो. आम्ही इथेच राहतो. गेल्या चार वर्षापासून आम्ही इथून कुठे गेलो नाही, आम्ही इथे झोपल्यानंतर डंपर चालक सरळ अंगावर आला, आणि बाळांच्या अंगावर घातला’.

दुसऱ्या एका प्रत्यक्षदर्शीनी या घटनेबाबत बोलताना सांगितलं, ‘सर्वजण झोपले होते. बारा एक वाजण्याच्या सुमारास डंपर फुटपाथवरून आत घुसल्यानंतर आरडाओरडा सुरू झाली. त्यानंतर आम्ही सगळे उठलो डंपरचालकाने मुलांना चिरडलं होतं. तसाच तो पुढे गेला. आम्ही कालच अमरावती वरून पुण्याला आलो होतो, अशी माहिती त्यांनी यावेळी दिली आहे.

या घटनेबाबत आणखी एका प्रत्यक्षदर्शी महिलेने सांगितलं, पुण्याच्या बाजूने डंपर आला. सगळे खाली फुटपाथवर झोपलेले होते. सगळे आपल्या लहान मुलांसह इकडे-तिकडे झोपलेले होते. डंपरचालकाने दारू पिलेली होती. त्यांनी मुलांच्या अंगावरून पुढे पर्यंत वाहन घातलं. जर त्याने दुसऱ्या बाजूला डंपर घातला असता तर पंधरा-सोळा जण डंपर खाली चिरडले गेले असते. तिथे असलेल्या अनेकांनी आरडा-ओरड केली त्यामुळे अनेक जण वाचले अन्यथा मोठा अनर्थ झाला असता. या घटनेमध्ये तीन जणांचा मृत्यू झाला आहे तर सहा जण जखमी झाले आहेत, असं त्यांनी यावेळी सांगितलं.

मृत झालेल्यांची नावं –
1. विशाल विनोद पवार वय 22 वर्ष, रा. अमरावती मूळ जिल्हा
2. वैभवी रितेश पवार वय 1 वर्ष
3. वैभव रितेश पवार वय 2 वर्ष

जखमी झालेल्यांची नावं-
1. जानकी दिनेश पवार, 21 वर्षे
2. रिनिशा विनोद पवार 18 वर्षे
3. रोशन शशादू भोसले, 9 वर्षे
4. नगेश निवृत्ती पवार, वय 27 वर्षे
5. दर्शन संजय वैराळ, वय 18
6. आलिशा विनोद पवार, वय 47 वर्षे

हे ही वाचा:

Eknath Shinde पत्रकार परिषदेतून होणार व्यक्त, नेमकं काय बोलणार याकडे राज्याचं लक्ष

Eknath Shinde यांनी महायुतीपुढे टाकली नवी गुगली; म्हणाले,”मुख्यमंत्रीपद मिळणार नसेल तर…”

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss