शेतीत कांदा हे सर्वात बेभरवशाचं पीक मानलं जातं. कांद्याला हवा तेवढा दर नसल्याने बऱ्याचदा शेतकऱ्यांना कांदा फेकून द्यावा लागला आहे, जेव्हा कांद्याला दर फार चांगला असतो तेव्हा शेतकऱ्यांकडे माल किंवा साठवलेला कांदा नसतो. कधी- कधी सरकारच्या धोरणांमुळे देखील कांद्याच्या दरात घसरण होते. यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांची सर्व बाजूने कोंडी नेहमीच होत असते. याच कांद्याने पुन्हा एकदा नवा उच्चांक गाठला आहे, कांद्याचे दर जरी वाढले असले तरी, शेतकऱ्यांकडे कांदाच शिल्लक राहिलेला नाही. कारण साठवणुकीतील असलेला कांदा हा सडल्यामुळे बाजारपेठेत कांद्याची मोठी आवक निर्माण झालेली आहे. यामुळे या कांदा दरवाढीचा फायदा शेतकऱ्यांना मिळणार नाही. त्यामुळेच ऐन दिवाळीसारख्या सणासुदीच्या तोंडावर कांद्याचे दर वाढत असल्यामुळे सामान्य ग्राहकांच्या डोळ्यात अश्रू येणार आहेत, हे म्हटलं तरी वावगं ठरणार नाही.
कांद्याच्या दराने गाठला उच्चांक
कांदा उत्पादनासाठी महाराष्ट्रातील नाशिक जिल्हा देशभर प्रसिद्ध आहे. कारण, नाशिकमधील कांदा हा देशभर नाही तर जगभरात देखील प्रसिद्ध आहे. लासलगावमधील असलेली कांद्याची बाजारपेठ संपूर्ण आशिया खंडातील सर्वात मोठी बाजारपेठ आहे. परंतु, कांद्याची अवाक घटल्यामुळे आता कांद्याच्या भावात तेजी आलेली आहे. नाशिक जिल्ह्यातील किरकोळ बाजारात कांद्याचा दर ५०-७० रुपये किलो इतका आहे. साठवणुकीतील कांदा सडल्यामुळे बाजारात कांद्याची आवक कमी झालेली आहे,त्यामुळे याचा परिणाम दरवाढीवर झाला आहे.
कांद्याचे दर कधी होणार स्थिर?
बाजारात लाल कांदा येण्यास अजून महिनाभराचा कालावधी बाकी आहे, आणि त्यातच जुने असलेले कांदे सडल्यामुळे सध्या कांद्याचे दर फार वाढलेले आहेत, यामुळे आणखी काही दिवस कांद्याच्या भावात तेजी राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे ऐन दिवाळी सारख्या सणासुदीच्या दिवसात कांद्याच्या दराने सर्वसामान्यांच्या डोळ्यात अश्रू येणार आहेत. त्यामुळे कांद्याचे दर कधी कमी होणार यावर सर्वसामान्य डोळे लावून बसलेले आहेत.
हे ही वाचा :
‘चला हवा येऊ द्या’ हा लोकप्रिय कार्यक्रम घेणार प्रेक्षकांचा निरोप
Basmati Rice ची निर्यात स्वस्त