महाराष्ट्र विधानसभेची रणधुमाळी आता शेवटच्या टप्प्यात आली आहे. आज दि. १८ नोव्हेंबरला प्रचार करण्याचा शेवटचा दिवस आहे. दोन दिवसांनी म्हणजेच २० नोव्हेंबरला विधानसभेसाठी मतदान होणार आहे. पण त्याआधी राज्यातील राजकीय वातावरण तापत आहे. अशातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे पुणे जिल्हाध्यक्ष शरद सोनावणे यांची शिवसेना पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे.
पक्ष विरोधी कार्य केल्याबद्दल शरद सोनावणे यांना शिवसेना पक्षातून निलंबित करण्याची माहिती समोर आली आहे. शरद सोनावणे जुन्नर विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या अतुल बेनके यांच्या विरोधात बंडखोरी करत उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. शिवसेना शिस्तभंग समितीच्या शिफारशीनुसार शिवसेना मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या आदेशावरून ही कारवाई करण्यात आली आहे.
तसेच बुलढाण्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मैत्रीपूर्ण लढतीतील शिवसेनेच्या उमेदवाराला पाठिंबा दिल्याचं पत्र बुलढाणा जिल्ह्यात वायरल झाले होते. या पत्रावर अजित पवार जिल्हाध्यक्ष नाझेर काझी यांनी खुलासा केला आहे. हे पत्र खोटे असून मतदारामध्ये संभ्रम पसरविण्याचा प्रयत्न आहे, असं काझी यांनी सांगितले. व्हायरल झालेल्या पत्रात अजित पवार गटाचे सरचिटणीस शिवाजीराव गर्जे यांनी शिवसेनेच्या उमेदवार डॉ. शशिकांत खेडेकर याना पाठिंबा दिल्याचे म्हटले आहे. पण हे पत्र खोटे आणि चुकीचे असल्याचा खुलासा अजित पवार गटाकडून करण्यात आला आहे. खोट्या अफवा आणि खोट्या पत्रावर कोणीही विश्वास ठेऊ नये, असे आवाहन अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष नाझेर काझी यांनी केले आहे.
हे ही वाचा:
विरोधक प्रचारापासून रोखण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप करीत वारीस पठाण यांना अश्रू अनावर