spot_img
Saturday, March 22, 2025

Latest Posts

Eknath Shinde : मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्यात शह – काटशह सुरु

दोन दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी नाशिकमध्ये भरणाऱ्या कुंभमेळा आयोजनाची बैठक मुंबई येथे घेतली होती, या बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आमंत्रण असून देखील ते उपस्थित न राहता एकनाथ शिंदे यांनी मलंगगडच्या कार्यक्रमाला जाणे पसंत केले. नाशिक येथे होणाऱ्या कुंभमेळाव्याला २ दिवसांपूर्वी झालेल्या आढावा बैठकीचा आज एकनाथ शिंदे जाऊन आढावा घेणार आहेत, त्यामुळे आज देखील मंत्र्यांनी आयोजित केलेल्या बैठकीकडे एकनाथ शिंदे यांनी पाठ फिरवत नाशिक मध्ये बैठक घेणं पसंत केलं आहे. त्यामुळे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्यातील दरी वाढतच असल्याचे दिसत आहे.

Eknath Shinde in Nashik: राज्यात महायुतीच सरकार सुरु आहे. महायुतीच्या सरकारने अनेक सोबतीने निर्णय घेतले आहेत. असलं तरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यातील अंतर वाढत आहे. सध्या दरी पडल्याचे दिसत आहे. दोन दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी नाशिकमध्ये भरणाऱ्या कुंभमेळा आयोजनाची बैठक मुंबई येथे घेतली होती, या बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आमंत्रण असून देखील ते उपस्थित न राहता एकनाथ शिंदे यांनी मलंगगडच्या कार्यक्रमाला जाणे पसंत केले. नाशिक येथे होणाऱ्या कुंभमेळाव्याला २ दिवसांपूर्वी झालेल्या आढावा बैठकीचा आज एकनाथ शिंदे जाऊन आढावा घेणार आहेत, त्यामुळे आज देखील मंत्र्यांनी आयोजित केलेल्या बैठकीकडे एकनाथ शिंदे यांनी पाठ फिरवत नाशिक मध्ये बैठक घेणं पसंत केलं आहे. त्यामुळे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्यातील दरी वाढतच असल्याचे दिसत आहे. विशेष म्हणजे नाशिक जिल्ह्यातील पालकमंत्री पदाचा तिढा अद्याप कायम आहे, त्यामुळे महायुती सरकार मध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यातील वाद उघडपणे दिसत आहेत.

दोन दिवसांपूर्वी मुख्यमंत्र्यांनी नाशिकच्या कुंभमेळ्याची आढावा बैठक सह्याद्री वरती घेतली होती. या बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे निमंत्रित होते, एकनाथ शिंदे हे नगर विकास मंत्री आहेत आणि या आढावा बैठकीमध्ये महानगरपालिकचे अधिकारी होते. त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या विभागाची आढावा बैठक होती. मात्र, या बैठकीला एकनाथ शिंदे यांनी त्यांना टाळलेलं होतं. त्याचबरोबर ते मलंगडच्या कार्यक्रमाला पोहोचले. त्यानंतर आता दोन दिवसानंतर एकनाथ शिंदे नाशिक मध्ये जाऊन कुंभमेळ्याची आढावा बैठक घेणार आहे. मुख्यमंत्र्यांनी बोलावलेल्या बैठकीला एकनाथ शिंदे गैरहजर राहतात. त्यानंतर ते आज नाशिक मध्ये जाऊन आढावा बैठक घेतात. त्यामुळे दोघांमधल्या अंतर वाढत आहे का? असा प्रश्न समोर येत आहे. त्याचबरोबर एकनाथ शिंदे नाराज आहेत का अशी चर्चा देखील आहे. नाशिकमध्ये आणि रायगडमध्ये असलेल्या पालकमंत्री पदाचा वाद अद्याप कायम आहे, त्यावर ती निर्णय होऊ शकलेला नाही. या पदाबाबत ज्याप्रमाणे शिवसेना आग्रही आहे. त्याप्रमाणे भाजप देखील आग्रही आहे, अशातच मुख्यमंत्र्यांच्या बैठकीला जाणं टाळणं. आणि स्वतः जाऊन आढावा बैठक घेणे, यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

मुख्यमंत्र्यांनी बोलावलेल्या मंत्रिमंडळ सर्व बैठकींना एकनाथ शिंदे यांनी शंभर दिवसांचा आढावा घेताना देखील एकनाथ शिंदे यांच्या विभागाचा आढावा घेताना एकनाथ शिंदे गैरहजर राहिलेले आहेत. त्यामुळे आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बोलावलेल्या बैठकांना उपमुख्यमंत्री किंवा शिंदे उपस्थित का राहत नाहीत? त्यांची नाराजी अजूनही दूर झाली नाही का? असा प्रश्न देखील समोर येतं आहे. आज नाशिकमध्ये एकनाथ शिंदे यांच्या बैठकांना भाजपचे नेते भाजपचे मंत्री उपस्थित राहणार का? की फक्त शिवसेना नेते आणि आमदार उपस्थित राहणार? हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे. तर पालकमंत्री पदावरून निर्माण झालेला हा तिढा एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस यांना कायमचे दूर करेल का? महायुतीला याचा फटका बसेल का हे पहत्तवाचे ठरणार आहे.

हे ही वाचा:

Eknath Shinde : राजकारणात मन मोठं असावं लागतं, म्हणत एकनाथ शिंदेंचा ठाकरेंवर वार

Aaditya Thackeray : कोणी कोणाचं कौतुक करावं हा त्यांचा विषय आहे – आदित्य ठाकरे यांचे प्रसारमाध्यमांना उत्तर

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss