spot_img
Wednesday, March 19, 2025

Latest Posts

Eknath Shinde : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जीवे मारण्याची धमकी

राज्याचे उपमुख्यमंत्री तसेच शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. गोरेगाव पोलिस ठाण्यात धमकीचा ईमेल करण्यात आला असून शिंदे यांची गाडी बॉम्बने उडवण्याचा उल्लेख करण्यात आला आहे. पोलिसांकडून ई-मेल पाठवणाऱ्याचा शोध सुरू झाला आहे.

Eknath Shinde : राज्याचे उपमुख्यमंत्री तसेच शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. गोरेगाव पोलिस ठाण्यात धमकीचा ईमेल करण्यात आला असून शिंदे यांची गाडी बॉम्बने उडवण्याचा उल्लेख करण्यात आला आहे. पोलिसांकडून ई-मेल पाठवणाऱ्याचा शोध सुरू झाला आहे. तर यापूर्वी एकनाथ शिंदे यांना धमकीचा मेसेज ही आला होता. मुंबईतील जवळपास ७ ते ८ पोलीस ठाणे आणि इतर विभागात धमकीचा मेल आहे.

एकनाथ शिंदे हे असे नेते आहेत. जे थेट लोकांमध्ये मिसळतात. त्यांच्या सुख, दु:खाशी एकरुप होतात. सध्या त्यांच्याकडे शिवसेनेची जबाबदारी आहे. पक्ष संघटना अधिक बळकट करण्याकडे त्यांनी लक्ष केंद्रीत केलं आहे. तसेच राज्याच्या विविध भागातून मोठ्या प्रमाणात ठाकरे गटातून शिवसेनेत इनकमिंग सुरु आहे. एकनाथ शिंदे यांनी बऱ्यापैकी पक्ष विस्तार केला आहे. त्यांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवून राज्यभरातील ठाकरे गटाचे पदाधिकारी, कार्यकर्ते शिवसेनेत दाखल होत आहेत.त्यामुळे त्यांचे वाढते वर्चस्व पाहता त्यांना कडक संरक्षणाची गरज आहे.

आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्ली येथे महायुतीचे नेते दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्या शपथविधीसाठी गेले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, दोन्ही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्याशी संवाद साधणार आहेत. मंत्रालय पोलीस, जेजे मार्ग पोलीस ठाण्यात हा धमकीचा मेल आला आहे. मेल पाठवणाऱ्या अज्ज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे. यासाठी सर्व तपास यंत्रणा सर्तक झाल्या असून मुंबई गुन्हे शाखेकडून तपास सुरु झाला आहे. मागच्या काही दिवसांपासून शिंदे यांना निनावी धमकी देण्याचे प्रकार सुरु आहेत. एकनाथ शिंदे यांच्याच नावाचा उल्लेख का केला? हा ई-मेल कोणी पाठवला? त्यामागचा उद्देश यासंदर्भात चौकशी सुरु आहे. अज्ज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करुन मुंबई पोलिसांकडून शोध सुरु आहे. याआधी सुद्धा एकनाथ शिंदे यांना नक्षलवाद्यांकडून धमकी मिळाली होती.

 

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

 

Latest Posts

Don't Miss