मुंबईतील मातोश्रीवर आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून सरकारवर टीका केली. त्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रत्युत्तर दिल आहे. मराठा आरक्षणाचे खरे मारेकरी उद्धव ठाकरेच असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले आहेत. मराठा समाजाबद्दल त्यांना किती संवेदना आहेत, हे त्यांनाही माहिती आहे आणि मराठा समाजालाही असं देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी म्हटलं आहे. दरम्यान सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षण न टिकण्यासाठी ठाकरेच जबाबदार असल्याचं म्हणत मुख्यमंत्री शिंदेंनी ठाकरेंवर गंभीर आरोप केले.
आम्ही करु शकलो नाही, पण हे करत आहेत म्हणून त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. मराठा आरक्षणावर बोलण्याचा ठाकरेंना नैतिक अधिकार नाही. ज्या काळामध्ये मराठा समाजाला आरक्षण देण्यात आलं. उच्च न्यायालयामध्ये त्या आरक्षणाला चॅलेंज देण्यात आलं, तिथेही ते आरक्षण टिकलं. ते टिकवण्याचं काम मी आणि देवेंद्र फडणवीसांनी केलं. पण दुर्दैवाने सर्वोच्च न्यायालायमध्ये ते टिकलं नाही. तेव्हाच्या मुख्यमंत्र्यांनी ते टिकवलं नाही’, असं म्हणत मुख्यमंत्री शिंदे यांनी ठाकरेंवर हल्लाबोल केला.
मराठा आरक्षणाचा मुद्दा हा सध्या राज्यात चांगलाच पेटला आहे. राज्यात अनेक ठिकाणी हे आंदोलन अधिक आक्रमक होत चालल्याचं पाहायला मिळतय. त्यामुळे राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न देखील आता ऐरणीवर आला आहे. दरम्यान उद्धव ठाकरे यांनी मराठा समाजाच्या मृतदेहावर आरक्षणाचा आदेश सरकार ठेवणार का? असा संतप्त सवाल सरकारला केला होता. त्यावर एकनाथ शिंदे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
हे ही वाचा :
Smriti Irani Malvani Laguage: ‘माका पिठी-भात आवडता’
जरांगे पाटलांच्या निर्धाराने शिंदे फडणवीस सरकारसमोर आव्हान!