spot_img
Friday, December 6, 2024
spot_img

Latest Posts

Eknath Shinde पत्रकार परिषदेतून होणार व्यक्त, नेमकं काय बोलणार याकडे राज्याचं लक्ष

महाराष्ट्र विधानसभा २०२४ च्या निवडणूकीत महायुतीने २३० जागांवर विजय मिळवला. यात भाजप १३२ जागा, शिवसेना शिंदे गटाला ५७ जागा आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाला ४१ जागा मिळाल्या. तर महाविकास आघाडीला फक्त ४६ जागा मिळाल्या. यात काँग्रेस १६ जागा, ठाकरे गट २० जागा आणि राष्टवादी शरद पवार गटाला १० जागा मिळाल्या. तसेच इतर अपक्ष यांना १२ जागा मिळाल्या आहेत. त्यामुळे राज्यात महायुतीची सत्ता येणार हे आता निश्चित झाले आहे. महाराष्ट्रात सध्या सत्तास्थापनेच्या घडामोडींना वेग आला आहे. त्यात आज दुपारी ३ वाजता एकनाथ शिंदे हे पत्रकार परिषद घेणार आहेत.

महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर झाल्यानंतर दोन दिवस होऊनही मुख्यमंत्री कोण होणार हे अजूनही स्पष्ट झालेले नाही. त्यातच २७ नोव्हेंबरला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा राज्यपालांकडे दिला आहे. त्यानंतर आज ते आपली भूमिका स्पष्ट करणार आहे.

भाजपकडून एकनाथ शिंदे मुख्यमंत्रीपद सोडण्याच्या मोबदल्यात केंद्रात महत्त्वाच्या खात्याचे मंत्रिपद किंवा राज्यात उपमुख्यमंत्रीपद देण्याचा पर्याय ठेवला होता. मात्र, एकनाथ शिंदे यांनी हे दोन्ही पर्याय नाकारल्या आहेत. त्याऐवजी एकनाथ शिंदे यांनी एक नवा प्रस्ताव भाजपासमोर ठेवला आहे. मला राज्यात उपमुख्यमंत्रीपद मिळणार नसेल तर मला महायुतीला सरकारचा संयोजक हे पद द्यावे. कारण राज्यातील विधानसभा निवडणूक ही माझ्या नेतृत्त्वाखाली लढवण्यात आली होती, असे एकनाथ शिंदे यांचे मत आहे. तसेच आपला मुलगा आणि खासदार श्रीकांत शिंदे यांना राज्यात उपमुख्यमंत्रीपद देण्यात यावे, अशी मागणी एकनाथ शिंदे यांनी केली आहे. एकनाथ शिंदे यांच्या या मागणीने भाजप आणि महायुतीचे नेते पेचात पडले आहेत. भाजपने अजूनही या प्रस्तावावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. आधीच भाजपच्या राजकीय वर्तुळात खल सुरु असून त्यामुळेच महायुती सरकारच्या शपथविधीला उशीर होत असल्याची माहिती समोर आली आहे. एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्रीपद सोडण्यास तयार असले तरी श्रीकांत शिंदे यांना थेट उपमुख्यमंत्रीपदी बसवण्याचा निर्णय भाजपच्या नेत्यांना कितपत रुचणार हे आता बघावे लागणार आहे. त्यात आज ते पत्रकार परिषदेत काय बोलणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

हे ही वाचा:

राजभवनातून बाहेर पडल्यावर Deepak Kesarkar यांची प्रतिक्रिया; म्हणाले,”नवीन सरकार लवकरच…”

मुख्यमंत्री Eknath Shinde यांनी दिला मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा, शपथविधी होईपर्यंत शिंदे असणार काळजीवाहू मुख्यमंत्री

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss