Saturday, June 3, 2023

Latest Posts

एकनाथ शिंदे घेणार वाहनचालकांसाठी मोठा निर्णय

मुख्यमंत्र्यांच्या वाहनांचा ताफा प्रवास करत असताना सुरक्षेची पूर्ण खबरदारी घेतली जाते. मुख्यमंत्र्यांचा ताफा जात असताना संबंधित संपूर्ण रस्त्यावरील वाहतूक ही काही वेळेसाठी थांबवली जाते. त्यामुळे वाहतुकीचा नाहक खोळंबा तर होतोच. सोबतच वाहनचालकांना मनस्ताप देखील सहन करावा लागतो.

मुख्यमंत्र्यांच्या वाहनांचा ताफा प्रवास करत असताना सुरक्षेची पूर्ण खबरदारी घेतली जाते. मुख्यमंत्र्यांचा ताफा जात असताना संबंधित संपूर्ण रस्त्यावरील वाहतूक ही काही वेळेसाठी थांबवली जाते. त्यामुळे वाहतुकीचा नाहक खोळंबा तर होतोच. सोबतच वाहनचालकांना मनस्ताप देखील सहन करावा लागतो. सर्वसामांन्याची ही चिडचिड नवनिर्वाचित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हेरून मोठा निर्णय घेतला आहे. त्यामुळे त्यांच्या या वागणुकीतून त्यांना जनसामान्यांबद्दल किती काळजी आहे हे त्यांच्या वागण्यातून दिसून येते. त्याचबरोबर सार्वजनिक रस्त्यावर बेजवाबदार वाहने चालवणार्यांना चांगलीच समज देखील मिळणार आहे.

मुख्यमंत्र्यांच्या ताफ्याला स्पेशल प्रोटोकॉल नको, असे आदेशच शिंदे यांनी दिले आहेत. या संदर्भात शिंदे यांनी पोलीस महासंचालक रजनीश सेठ आणि पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांच्याशी या आधी चर्चा केली होती.महाराष्ट्रात तसेच देशभरात रस्ते अपघातांमध्ये दरवर्षी हजारो लोक जीव गमवतात. यादरम्यान महाराष्ट्रात रस्त्यांवर बेजबाबदारपणे वाहन चालवणे महागात पडणार आहे. सरकार रॅश ड्रायव्हिग हा अजामीनपात्र गुन्हा ठरवण्याच्या विचारात आहे. यासंबंधी आज, १५ मे रोजी महत्वाची बैठक होणार आहे.सार्वजनिक रस्त्यावर बेजबाबदारपणे वाहन चालवणे हा अजामीनपात्र गुन्हा ठरवण्यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज, १५ मे रोजी एक बैठक घेणार आहेत. महाराष्ट्र मुख्यमंत्री कार्यालयाने याबद्दल माहिती दिली असून एकनाथ शिंदे या बैठकीच्या अध्यक्षस्थानी असणार आहेत.

सार्वजनिक रस्त्यावर बेजबाबदारपणे वाहन चालवणाऱ्यांना यामुळे चाप बसेल अशी आशा व्यक्त केली जात आहे. दरम्यान सरकारकडून रस्ते अपघात रोखण्यासाठी वेगवेगळे उपक्रम राबवण्यात येतात.त्यासोबतच वाहन चालकांच्या जागृतीसाठी देखील मोहिमा राबवल्या जातत. कायदा कडक झाल्यानंतर रस्ते अपघात कमी होण्यास फायदा होऊ शकतो.तसेच वाहतूक परवाना, १८ वर्षावरील युवकांना वाहन चालवण्यास परवानगी वगरे वगैरे मुद्दे या मध्ये असण्याची शक्यता वर्तवली जाऊ शकते. त्याच बरोबर वाहनचालकांची आता नवीन कोणते नियम शिंदे सरकार घालणार आहे याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

हे ही वाचा : 

जयंत पाटील यांना ईडीने दिला दुसऱ्यांदा समज

अहमदनगरच्या शेवगावमध्ये दोन गटांत राडा

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो कर.

Latest Posts

Don't Miss