spot_img
Friday, December 6, 2024
spot_img

Latest Posts

एकनाथ शिंदेंची चुप्पी अन् भाजपला ताप ! शिंदेंच्या मनात नेमकं दडलंय तरी काय ?

महाराष्ट्रात सुरु झालेल्या राजकीय नाट्यामुळे महायुतीचा शपथविधी लांबणीवर पडला आहे. महायुतीचा शपथविधी ५ डिसेंबरला होण्याची शक्यता असली तरी एकनाथ शिंदे यांची नाराजी आणि चुप्पी पाहता ५ डिसेंबरला तरी महायुतीचा शपथविधी पार पडणार की नाही याबाबत शंका निर्माण झाली आहे.

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीला प्रचंड यश मिळाल्यानंतर महायुती लगेच आपली सत्तास्थापन करेल असा अंदाज होता. त्यानंतर महाराष्ट्रात सुरु झालेल्या राजकीय नाट्यामुळे महायुतीचा शपथविधी लांबणीवर पडला आहे. महायुतीचा शपथविधी ५ डिसेंबरला होण्याची शक्यता असली तरी एकनाथ शिंदे यांची नाराजी आणि चुप्पी पाहता ५ डिसेंबरला तरी महायुतीचा शपथविधी पार पडणार की नाही याबाबत शंका निर्माण झाली आहे. या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे एखादा मोठा निर्णय घेऊ शकतात, अशी चर्चा रंगली आहे.

दिल्लीमध्ये २८ नोव्हेंबरला केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्या निवासस्थानी एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यासह काही प्रमुख नेत्यांची बैठक पार पडली. त्यानंतर २९ नोव्हेंबरला सकाळी एकनाथ शिंदेसह सर्व मुंबईला रवाना झाले. मुंबईला आल्यानंतर भाजप नेत्यांची बैठक पार पडणार होती. मात्र, लगेच एकनाथ शिंदे त्यांच्या दरे गावाकडे विश्रांतीसाठी रवाना झाले. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले. अशातच बोलताना शिंदे गटाचे संजय शिरसाट यांनी एक सूचक वक्तव्य केले. ते म्हणाले की, “एकनाथ शिंदे यांच्यासमोर राजकीय पेचप्रसंग येतो तेव्हा, त्यांना जेव्हा वाटते की आपल्याला विचार करायला वेळ हवा आहे, तेव्हा ते आपल्या गावी जातात. दरे गावात मोबाईल लागत नाही. तिकडे ते आरामात निर्णय घेतात. जेव्हा एखादा मोठा निर्णय घ्यायचा असतो, तेव्हा ते नेहमी दरे गावात जातात. आत ते गावी गेले आहेत, कदाचित उद्या संध्याकाळपर्यंत ते एखादा मोठा निर्णय घेऊ शकतात. राज्यात जी उलथापालथ सुरु आहे, त्याबाबत ते निर्णय घेतील”, असे संजय शिरसाट म्हणाले.

दिल्लीमध्ये पार पडलेल्या बैठकीत जवळजवळ देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री पदाचा भार सोपवण्यात येईल यावर शिक्कामोर्तब झाला. महायुतीचे नेते दिल्लीवरून परतल्यावर मुंबईत खातेवाटपासंदर्भात बैठक पार पडणार होती. परंतु, एकनाथ शिंदे यांनी गृहखात्याची मागणी लावून धरल्याने चर्चा पुढे सरल्याच नाही. त्यामुळे महायुतीची बैठक रद्द करण्यात आली. आता एकनाथ शिंदे मुंबईला आल्यानंतर काय निर्णय घेतील याची सर्वांना उत्सुकता लागली आहे.

हे ही वाचा:

Eknath Shinde Live: विधानसभेत मिळालेला विजय ऐतिहासिक, मी कॉमन मॅन म्हणून….काय म्हणाले एकनाथ शिंदे?

लोकसभेच्या निवडणूकीतून आम्ही जे शिकलो तसं महाविकास आघाडीने शिकलं पाहीजे: Chandrashekhar Bawankule

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss