Friday, December 1, 2023

Latest Posts

जेजुरीत सोमवती यात्रेचा उत्साह

सोमवती यात्रेनिमित्त वाहतुकीतही अनेक महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत. जेजुरीत श्री खंडोबा देवाच्या यात्रेनिमित्त (दि. 13) वाहतूक बदल करण्यात आला आ

सोमवती यात्रेनिमित्त वाहतुकीतही अनेक महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत. जेजुरीत श्री खंडोबा देवाच्या यात्रेनिमित्त (दि. 13) वाहतूक बदल करण्यात आला आहे.

अखंड महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या जेजुरी गडावर आज सोमवती अमावस्या यात्रा साजरी होत आहे. या यात्रेनिमित्त राज्यातून नव्हे, तर परराज्यातून हजारो भाविक जेजुरी नगरीमध्ये दाखल झाले आहेत. सकाळी सात वाजता खंडोबा देवाच्या पालखीचं कऱ्हा स्नानासाठी गडावरून प्रस्थान झालं आहे.

जेजुरीच्या खंडोबाची सोमवती यात्रा (Somvati Amavasya Yatra) आज 13 नोव्हेंबरला भरली आहे. सकाळी 7 च्या सुमारास खंडोबा गडावरुन हा पालखी सोहळा सुरू झाला आहे. दुपारी 12 ते 12.30 च्या सुमारास खंडोबा आणि म्हाळसा देवीच्या मूर्तीचं कर्‍हा नदीवर स्नान सोहळा संपन्न होणार आहे. या यात्रेसाठी राज्यभरातून जेजुरी गडावर अनेक भाविकांनी गर्दी केली आहे. त्यांच्या सोयीसाठी प्रशासनाकडून अनेक उपाययोजनाही करण्यात आलेल्या आहेत. काही दिवसांपूर्वी सोमवती यात्रेच्या नियोजनाबाबत एक महत्त्वाची बैठक पार पडली होती. भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी खांदेकरांना विशिष्ट ड्रेसकोड देण्यात आला आहे. तसेच, पालखी सोहळ्यातील भाविकांना चहा,पाणी व नाश्त्याची व्यवस्था करण्यात आली आहे. सोमवती यात्रेनिमित्त वाहतुकीतही अनेक महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत.

हे ही वाचा : 

दिवाळीला कुणाचा पत्ता होणार कट?विकेंड का वारला सलमान ऐश्वर्यावर भडकला

दिवाळी पाडवा कधी आहे? शुभ मुहूर्त आणि महत्व घ्या जाणून

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss