spot_img
Tuesday, January 14, 2025

Latest Posts

HMPV Virus चा राज्यात शिरकाव; राज्यात पुन्हा होम क्वारंटाईन, आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर म्हणाले…

चीनमध्ये HMPV या नव्या व्हायरसनं शिरकाव केल्याने जगभरातील देशांची धाकधूक वाढवली आहे. बेंगळुरू आणि गुजरातमध्ये एचएमपीव्ही विषाणूचे रुग्ण आढळल्यानंतर आता तो महाराष्ट्रातही दाखल झाला आहे.

चीनमध्ये HMPV या नव्या व्हायरसनं शिरकाव केल्याने जगभरातील देशांची धाकधूक वाढवली आहे. बेंगळुरू आणि गुजरातमध्ये एचएमपीव्ही विषाणूचे रुग्ण आढळल्यानंतर आता तो महाराष्ट्रातही दाखल झाला आहे. राज्यातील नागपुरातील दोन मुलांचा एचएमपीव्ही चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. नागपूर शहरातील रामदासपेठ येथील खासगी रुग्णालयात दोन बालकांना खोकला व ताप आल्याने उपचारासाठी आणण्यात आले होते. 3 जानेवारी रोजी नागपुरातील एका खाजगी रुग्णालयात ७ वर्षांचा मुलगा आणि १४ वर्षांच्या मुलीचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. या दोन्ही मुलांना खोकला आणि ताप होता. आता देशभरात एचएमपीव्हीची एकूण सात प्रकरणे समोर आली आहेत. आता या पार्श्वभूमीवर राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर (Prakash Abitkar) यांनी महत्त्वाचे वक्तव्य केले आहे.

प्रकाश आबिटकर यांनी एबीपी माझा वाहिनीशी बोलत असताना म्हटले आहे की, याबाबत आपण एक बैठक बोलावली आहे. हा विषाणू यापूर्वीपासूनच अस्तित्वात आहे. फक्त चीनमध्ये त्याची संख्या झपाट्याने वाढल्याने चीनने काळजी घेण्याचे काम केले आहे. आपल्याकडे याबाबत केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचना आलेल्या आहेत. कोरोनाकाळात रुग्णांना होम क्वारंटाईन करण्यात आले होते. तसेच आयसोलेशन वॉर्ड उभारण्यात आले होते. यंदाही कोरोना सारखी तयारी केली जात आहे का? असे विचारले असता केंद्र शासनाने कालच निर्देश जारी केलं आहेत. राज्यातील आरोग्य विभाग त्याच पद्धतीने कामकाज करत आहे. आपली संपूर्ण यंत्रणा अलर्ट मोडवर आली आहे. आरोग्य विभाग नागरिकांना योग्य त्या सूचना देतील. नागरिकांनी काळजी घ्यावी, घाबरण्याचे काहीही कारण नाही. ज्यांची प्रतिकारशक्ती कमी आहे. त्यांना अधिक काळजी घेण्याची आवश्यकता आहे, असे त्यांनी म्हटले आहे. आरोग्य विभागाच्या सूचना आज किंवा उद्या जाहीर होतील, असे प्रकाश आबिटकर यांनी म्हटले आहे.

काय करावं?

खोकताना किंवा शिंकताना आपलं तोंड आणि नाकावर रुमाल किंवा टिश्यू पेपर ठेवावा.
साबण, पाणी किंवा अल्कोहोलवर आधारित सॅनिटायझरनं आपले हात वारंवार धुवावेत.
ताप, खोकला आणि शिंका येत असल्यास सार्वजनिक ठिकाणांपासून दूर राहा.
भरपूर पाणी प्या आणि पौष्टिक खा
संक्रमण कमी करण्यासाठी सर्व ठिकाणी व्हेंटीलेशन होईल, याची दक्षता घ्या.

काय करणं टाळावं?

खोकलेल्या किंवा शिंकलेल्या हातांनी हस्तांदोलन करणं टाळावं. यामुळे संसर्ग लगेच पसरतो.
टिश्यू पेपरचा वापर केल्यानंतर तो कचरा पेटीत टाकावा. वारंवार एकाच टिश्यू पेपरचा वापर करणं टाळावं.
आजारी लोकांपासून लांब राहावं. व्हायरल इन्फेक्शन झालेलं असल्यास शक्यतो रुग्णाच्या जवळ जाऊ नये. शक्य असल्यास त्याला घरातच आयसोलेट करावं.
डोळे, नाक आणि तोंडाला वारंवार स्पर्श करू नये.

हे ही वाचा:

Bhau Torsekar थेट म्हणाले, Nikhil Wagle यांनी शिवसेना संपावी म्हणून पत्रकारिता केली…

Matoshree, Sanjay Raut, Uddhav Thackeray, Bhau Torsekar की… नेमकं कोण झालं बदनाम?

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss