खून करणाऱ्या आणि खंडणी मागणाऱ्यांपेक्षा सामूहिक कट रचणारा सगळ्यात मोठा गु्न्हेगार आहे.देशमुख कुटुंब तुमच्या घरी आलं आहे, त्या कुटुंबाचा अपमान होईल अशी भूमिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेऊ नये. एक जरी आरोपी सुटला तरी देशमुख कुटुंबाच्या जीवाला धोका आहे, असे वक्तव्य मराठा आंदोलक मनोज जरांगे-पाटील यांनी केले आहे.
न्याय-देवता न्याय करेल, आरोपींना फासावर लटकवेल. एवढे मोठे पाप करणारे लोकं राज्यासाठी घातक आहेत. काल सीसीटीव्ही मिळाला यापेक्षा काय पुरावा हवा आहे. खुनातील आणि खंडणीतील आरोपी एकच आहेत, त्यांच्यावर मोक्का दाखल करा आणि सर्वांची नार्को टेस्ट करा. आरोपी फरार झाल्यानंतर त्यांना सांभाळणारे सहआरोपी होणं गरजेचं आहे, असे जरांगे-पाटील म्हणाले.
गुंडाच्या टोळ्या चालवणाऱ्यांना पाठीशी घालणार असाल तर हा महाराष्ट्राला कलंक आहे. मुख्यमंत्र्यांच्या शब्दावर मराठा समाज शांत आहे. मुख्यमंत्र्यांना आपलं कुटुंब म्हणून देशमुख कुटुंबाकडे पाहावं लागणार आहे. तुम्ही जर एखाद्या आरोपीला पाठीशी घालण्याचा प्रयत्न केला तर महाराष्ट्राची जनता शांत बसणार नाही. मी संतोष देशमुख यांना न्याय मागतो तर मी जातीयवादी आहे का? वाल्मिक कराडचा पाठीराखा मंत्री आहे, तो सुद्धा आता यात यायला पाहिजे, असा इशारा मनोज जरांगे-पाटील यांनी दिला आहे.
हे ही वाचा :
अपात्र लाडक्या बहिणींचे पैसे घेणार की नाही ? Aditi Tatkare यांनी केला खुलासा