spot_img
Thursday, March 20, 2025

Latest Posts

पाण्यात “नायट्रेट” च्या प्रमाणाचे धोकादायक घटक आढळून आल्याने खळबळ

प्रशासनाच्या वतीने प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी असलेल्या भूजल सर्वेक्षण विभागाच्या प्रयोगशाळेत त्या त्या जिल्ह्यातील ग्रामीण भागातील पाण्याचे नमुने तपासण्याचं काम केले जात आहे.

तुम्ही विषारी पाणी तर पित नाही ना? असे म्हटले तर वावगं ठरणार नाही. कारण जालन्यासह जिल्ह्यातील अनेक तालुक्यातील पाणी घातक बनत चाललंय, रासायनिक खतांच्या वापरामुळे अक्षरश: जमिनीतील पाणी बनतंय विष, जालन्यातील भूजल सर्वेक्षण विभागच्या प्रयोगशाळेत तपासण्यात आलेल्या नमुन्यातून पाण्यात ४५ प्रमाणापेक्षा अधिक”नायट्रेट” आढळून आले आहे. गेल्या पाच महिन्यात तपासण्यात आलेल्या एक हजार पाण्याच्या नमुन्यात ४०२ नमुने हे दूषित असल्याचे आढळून आले आहे. २१८ पाण्याच्या नमुन्यात “नायट्रेट” चं प्रमाण हे ४५ पेक्षा जास्त असल्याचं समोर आलंय. तर १०८ नमुन्यात कोलिफॉर्म बॅक्टेरिया,४ नमुन्यात ई. कोलाय बॅक्टेरिया आणि ३९ नमुन्यात मॅग्नेशियम, सोडीयम, कॅल्शियमसारख्या घटक आढळून आल्याने पिण्याचे पाणी दूषित असल्याचं आढळून आलंय. तर पाण्यात मोठ्या प्रमाणात शरीराला घातक असलेले रासायनिक घटक आढळून आल्याने नागरिकांच्या आरोग्य धोक्यात आल्याचं समोर आलंय. विशेष म्हणजे प्रशासनाला एवढा सगळा प्रकार उघडकीस येऊनही काहीच सोयर सुतक नसल्याचा अनुभव अनेक गावातील ग्रामस्थांना येतोय.

प्रशासनाच्या वतीने प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी असलेल्या भूजल सर्वेक्षण विभागाच्या प्रयोगशाळेत त्या त्या जिल्ह्यातील ग्रामीण भागातील पाण्याचे नमुने तपासण्याचं काम केले जात आहे. त्यामुळे असेच पाण्याचे नमुने जालना शहराच्या भूजल सर्व्हेक्षण विभागच्या प्रयोगशाळेत तपासण्यात आले आहेत. त्यात तपासण्यात आलेल्या नमुन्यात रासायनिक घटका बरोबर घातक बॅक्टेरिया असल्याचे ही आढळून आले आहे.अनेक गावातील पिण्याचं पाणी ही दूषित असल्याचं आढळून आलं. त्यामुळे स्वच्छता आणि पाणीपुरवठा विभागाचा कारभार किती भोंगळ आहे हे स्पष्ट झालंय.

रासायनिक घटकांत आढळून आलेल्या मॅग्नेशियम, सोडीयम, कॅल्शियम असे घटक आढळून आले आहेत. त्याच बरोबर पिण्याच्या पाण्यात “नायट्रेट”चं प्रमाण धोकादायक आहे. तर काही पाण्याच्या नमुन्यात ई. कोलाय,कोलिफॉर्म बॅक्टेरिया ही आढळून आल्याने पाणी पिल्यानंतर या घटकांचा शरीरावर दुष्परिणाम होतो. आजार वाढीस लागतात. शरीरातील या घटकांचं प्रमाण वाढल्यास मृत्यू देखील ओढावण्याची शक्यता नाकारता येत नाही. तरुणातील या घटकामुळे नपुसक्ता ही येण्याची जास्त शक्यता असते पण एवढं सगळं होऊनही प्रशासन, स्वच्छता आणि पाणीपुरवठा विभाग कुंभकर्णासारखी  गाढ झोप काढत असल्याचा आरोप होतोय.

जिल्ह्यातील ग्रामीण भागातील लोकांसाठी हे पाणी पिण्यायोग्य नसल्याचं या तपासणीतून समोर आले आहे.  त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना स्वच्छ पाणी देणाऱ्या पेयजल, जलजीवन मिशन अंतर्गत राबविल्या जाणाऱ्या पाणी पुरवठा योजनावर ही प्रश्न निर्माण झालाय. अनेक गावांत लावण्यात आलेलं पाणी फिल्टर प्लँट ही अनेक दिवसापासून बंद असल्याने प्रशासनच्या योजना ह्या फक्त लाल फिती पुरत्याच का? असा ही प्रश्न उपस्थित केला जातोय. त्यामुळे नागरिकांनी पिण्याचं पाणी उकळुन प्यावं. वेळप्रसंगी स्वच्छतेसाठी औषधांचा वापर करावा असं आवाहन तज्ञ जाणकारांनी केलाय.

एकंदरीत जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर शेतात वापरल्या जाणाऱ्या रासायनिक खतांचा औषधांचे घटक पाण्याच्या नमुन्यात आढळून येत असल्याने पाण्याचे विष बनतं का? असा प्रश्न या पाण्याच्या नमुन्याच्या तपासणीतून समोरं आले आहे.  त्यामुळे शेतात वापरल्या जाणाऱ्या रासायनिक खताबरोबर इतर रासायनिक घटकाचा वापरावर प्रमाण ठरवणं महत्वाचं ठरणार आहे. पाण्यात वाढणाऱ्या या रासायनिक घटकामुळे व वाढत्या बॅक्टेरियामुळे शरीराला लागणार पाणीचं विष बनतंय अस म्हणायची वेळ आलीये.

हे ही वाचा:

Raj Thackeray: मराठी भाषा गौरव दिनानिमित्त पुस्तक प्रदर्शन

Pune Crime Swargate bus depot: शिवशाही बस मध्ये झालेल्या अत्याचार प्रकरणी राजकीय बड्या नेत्याचा कार्यकर्ता

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss