spot_img
Thursday, March 20, 2025

Latest Posts

कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या वादग्रस्त वक्त्यव्यावर शेतकरी नेते Ravikant Tupkar यांची प्रतिक्रिया

महायुती सरकारने आत्तापर्यंत अनेक योजना राबविल्या आहे. त्यात शेतकऱ्यांसाठी पीक विमा योजना आणण्यात आली. या योजनेत प्रचंड मोठा भ्रष्टाचार झाल्याचे आरोप विरोधकांकडून होत असतानाच राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) यांनी एक महत्त्वाचे वक्तव्य केले आहे.

महायुती सरकारने आत्तापर्यंत अनेक योजना राबविल्या आहे. त्यात शेतकऱ्यांसाठी पीक विमा योजना आणण्यात आली. या योजनेत प्रचंड मोठा भ्रष्टाचार झाल्याचे आरोप विरोधकांकडून होत असतानाच राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) यांनी एक महत्त्वाचे वक्तव्य केले आहे. “हल्ली भिकारीसुद्धा एक रुपया घेत नाही. पण आम्ही शेतकऱ्यांना (Farmers) एक रुपयात पीक विमा दिला आहे”, असे माणिकराव कोकाटे यांनी म्हटले. त्यांच्या या वक्तव्याने वादंग निर्माण होण्याची चिन्हे आहेत. अमरावतीमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी हे वक्तव्य केले आहे.

माणिकराव कोकाटे यांनी केलेल्या वादग्रस्त विधानावर अनेकांनी प्रतिक्रिया देत संताप व्यक्त केला आहे. त्यावर शेतकरी नेते रविकांत तुपकरांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ते म्हणाले, “एक रुपया तर आता भिकारीही घेत नाही, पण एक रुपयात विमा आणून आम्ही शेतकऱ्यांवर उपकार केलेत, अशा पद्धतीचं वक्तव्य कृषी मंत्री यांच्याकडून करण्यात आलं हे वक्तव्य ऐकून जरा आश्चर्य वाटलं आणि शेतकऱ्यांच्या भावना या वक्तव्याने दुखावल्या गेल्या. कृषीमंत्री हे अतिशय अभ्यासू आहेत जाणकार आहेत. ग्रामीण भागातून आलेले आहेत त्यांच्या कामाची पद्धत ही चांगली आहे असं असताना त्यांनी असं वक्तव्य करणं हे थोडा आश्चर्यकारक वाटलं आणि आमच्या भावनांना दुखावणारे पण वाटलं.”

“कृषीमंत्री यांना माझी विनंती आहे की इथून पुढे तुम्ही शेतकऱ्यांना मदत करू शकत नसाल तर किमान शेतकऱ्यांच्या भावना दुखावण्याचा प्रयत्न अशी वक्तव्य करून करू नका आणि आमचं सांगणं आहे एक रुपया मध्ये पिक विमा योजना आणली म्हणजे सरकारने आमच्यावर उपकार केलेले नाहीयेत. लक्षात ठेवा सोयाबीनला दहा हजार रुपये भाव अपेक्षित असताना कापसाला १२,००० हजार रुपये भाव अपेक्षित असताना आम्हाला सरकारी भाव ४८९२ रुपये आणि आत्ता साडेतीन हजार भावाने सोयाबीन आम्हाला मार्केटमध्ये विकावं लागते की जिथं प्रतिक्विंटल सोयाबीनचा उत्पादन खर्च प्रत्यक्ष बांधावरचा सात साडेसात हजार रुपये आहे. अशा परिस्थितीमध्ये सरकार जर भाव ही देत नाही आणि मदतही करण्याच्या मूडमध्ये सरकार नसेल आणि उलट अशी वक्तव्य येत असतील तर यामध्ये शेतकऱ्यांचं मनोबल खचेल. सरकारमधले मंत्र्यांची वक्तव्य ही शेतकऱ्यांना उभारी देणारी शेतकऱ्यांना मानसिक दृष्ट्या उभं करणारी आणि सर्वार्थाने उभ करणारी वक्तव्य जबाबदार मंत्र्यांकडून झाली पाहिजे.”,असे रविकांत तुपकर म्हणाले.

Latest Posts

Don't Miss