Friday, March 29, 2024

Latest Posts

Kasara घाटात ४ वाहने एकमेकांवर आदळून भीषण अपघात

आताच अमोर आलेल्या माहितीनुसार मुंबई नसिक महामार्गावर (Mumbai Nashik Highway) नवीन कसारा घाटात (Kasara Ghat) आज पहाटेच्या सुमारास एक भीषण अपघात हा झाला आहे.

सध्या महामार्ग आणि अपघात हे जणू काय नवीन समीकरणच बनला आहे. मागील काही दिवसांमध्ये या रस्त्यावर अपघातांचे प्रमाण वाढले आहे.रोजच कुठे ना कुठे अपघात घडत आहे. आणि आता तर महामार्गावर अपघाताचे प्रमाण हे आणखी जास्त वाढत चालेले आहे. तर सध्या नाशिक-मुंबई महामार्ग हा अपघाताचे केंद्र बनत चाललं आहे. कारण या महामार्गावर रोजच अनेक अपघातांना सामोरे जावे लागत आहे. यात मृत्यूचे प्रमाण अधिक असून अनेकदा वेगाने वाहन चालवल्याने, ओव्हरटेक करताना अपघात होत असल्याचे निदर्शनास आले आहे.

आताच अमोर आलेल्या माहितीनुसार मुंबई नसिक महामार्गावर (Mumbai Nashik Highway) नवीन कसारा घाटात (Kasara Ghat) आज पहाटेच्या सुमारास एक भीषण अपघात हा झाला आहे. या अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी झाला आहे. तर या अपघात जखमी झालेल्या नागरिकांना तातडीने इगतपुरीच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्याचबरोबर अनेक कोंबड्याही या मरण पावल्या असून अपघातानंतर रस्त्यावर कोंबड्यांचा खच दिसून आला. दरम्यान या अपघाताचे कारण समजू शकले नाही.

मुंबई-नाशिक महामार्गावरील नवीन कसारा घाटात हा भीषण अपघात हा झाला आहे. ही धडक इतकी भीषण (Accident) होती, की यामध्ये चारही वाहने एकमेकांवर आदळली. या अपघातात नाशिकहून मुंबईच्या दिशेने कोंबड्या घेऊन जाणारे २ टेम्पो, १ पिकअप आणि १ अन्य वाहन अश्या ४ गाड्या एकमेकांवर आदळल्या. या भीषण अपघातात २ जणांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झालं आहे तर एकजण गंभीर जखमी झाला आहे. तर यातील अपघातग्रस्त वाहनामध्ये कोंबड्याची वाहतूक सुरु होती. मात्र अपघातात वाहनाचा चक्काचूर झाल्याने अनेक कोंबड्या मरण पावल्या आहेत. त्यामुळे कसारा घाटात कोंबड्यांचा खच दिसून आला.

अपघात जखमी झालेल्या नागरिकांना पुढील उपचारासाठी तातडीने इगतपुरी इथल्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. इस्तकार इजहर खान (वय 25) मुस्तापा खान (वय 35) अशी मृतांची नावे आहेत. नेमका अपघात कशामुळे झाला याचे कारण अद्यापही गुलदस्त्यात आहे. तर कसारा पोलीस आणि महामार्ग पोलीस, रुट पेट्रोलिंग टीम घटनास्थळी दाखल होऊन अपघातग्रस्त वाहने टोल क्रेनच्या सहाय्याने बाजूला करण्यात आली आहेत . तर घटनेचा अधिक तपास पोलिस करीत आहेत.

हे ही वाचा : 

सुलोचना दीदींविषयी Raj Thackeray यांची भावनिक पोस्ट, म्हणाले…

Me Honar Super Star Jallosh Juniors चे विजेते शरयू आणि सई, पुन्हा एकदा Vaibhav Ghuge ने मारली बाजी 

Odisha Train Accident मध्ये बचावलेल्या नागरिकांसाठी Reliance Foundation चा हातभार

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा .

Latest Posts

Don't Miss