Friday, April 19, 2024

Latest Posts

या कारणांमुळे साजरा केला जातो Father’s Day; जाणून घ्या संपूर्ण इतिहास

फादर्स डे (Fathers day) हा एक पाश्चत्य संस्कृतीतील आपल्या वडिलांसाठी साजरा केला जाणारा दिवस आहे. मागील काही वर्षांपूर्वी फादर्स डे हा दिवस भारतातही मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.

फादर्स डे (Fathers day) हा एक पाश्चत्य संस्कृतीतील आपल्या वडिलांसाठी साजरा केला जाणारा दिवस आहे. मागील काही वर्षांपूर्वी फादर्स डे हा दिवस भारतातही मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. फादर्स डे म्हणजेच पितृदिन. फादर्स डे हा वडिलांचा दिवस या दिवशी मुले मुली आपल्या वडिलांना शुभेच्छा देऊन वडिलांसाठी काहीतरी नवीन गोष्टी अथवा त्यांना भेटवस्तू देतात. आपल्याला आईबद्दलचं प्रेम आई समोर लगेच व्यक्त करता येतं परंतु बाबांबद्दलच प्रेम बहुतेकांना मोकळे पणाने व्यक्त करता येत नाही. त्यामुळे बहुतेकजण आपल्या बाबांना या दिवशी त्यांच्यावरच्या प्रेमाची कबुली देतात. फादर्स डे आपल्या वडिलांचा सन्मान करण्यासाठी साजरा केला जातो. वडील हे आपल्या कुटुंबाचे आधारस्तंभ असतात. आपल्या शिक्षणासाठी, आपल्या उज्वल भविष्यासाठी वडील खूप कष्ट घेतात. आपल्याला चांगले आयुष्य जगता यावे यासाठी ते दिवसरात्र कष्ट करतात अश्या वडिलांसाठी आदर व्यक्त करण्यासाठी फादर्स डे साजरा केला जातो. पण तुम्हाला माहित आहे का या फादर्स डेचा संपूर्ण इतिहास काय आहे त्याचबरोबर फादर्स डे ची सुरुवात कुठे व कशी सुरु झाली? चला तर मग याबद्दल अधिक जाणून घेऊया.

फादर्स डे ची सुरुवात ही अमेरिकेत झाली असून जगातील पहिला फादर्स डे हा १९ जून १९०९ साली साजरा केला होता. खरंतर फादर्स डे ची सुरुवात ही वोशिंग्टन (Washington) येथील स्पॉकेन(Spokane) शहरात झाली असून हा दिवस सोनोरा डॉड (Sonora Dodd) यांनी आपल्या पित्याच्या आठवणीत या दिवसाची सुरुवात केली. सोनोराची आई लवकर मरण पावल्याने सोनोराच्या वडिलांनी तिच्या आईची आणि वडिलांची भूमिका उत्तमरीत्या बजावली. तिच्या वडिलांनी तिचा आणि लहान भावंडांचा अगदी उत्तमरीत्या सांभाळ करून त्यांना मोठं केलं. त्याचकाळात मदर्स डेला मान्यताप्राप्त दिवस म्हणून घोषित केले होते याबद्दल सोनोराने ऐकले होते म्हणूनच आपल्या वडिलांना सुद्धा ओळखीची गरज आहे असे तिला वाटू लागले. म्हणूनच तिने स्पॉकेन मित्रमंडळाशी साधून तिच्या वडिलांचा वाढदिवस म्हणजेच ५ जून हा फादर्स डे म्हणून ओळखला जावा अशी मागणी केली. परंतु त्यांनी हा दिवस महिन्याच्या तिसऱ्या रविवारी ठेवण्याचा निर्णय घेतला. त्याचबरोबर माजी अध्यक्ष लिंडन बी. जॉन्सन यांनी १९६६ साली जून महिन्यातील तिसरा रविवार हा फादर्स डे म्हणून अधिकृतपणे घोषित करण्यासाठी राष्ट्रपती पदाच्या घोषणेवर स्वाक्षरी केली. म्हणूनच १९ जून हा फादर्स डे म्हणून साजरा केला जातो.

आजच्या काळात फादर्स डे हा भरपूर लोकप्रिय आहे. भारतात देखील भरपूर लोक फादर्स डे मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. मुलं आपल्या वडिलांसाठी असलेला आदर, प्रेम या दिवशी विविध गोष्टींमधून व्यक्त करतात. हा दिवस आपल्या प्रेमळ, कष्टाळू वडिलांसाठी समर्पित केला जातो.

हे ही वाचा : 

World Test Championship Final मध्ये ऑस्ट्रेलिया संघात एका नव्या खेळाडूची एन्ट्री

औरंगजेबाचं नाव घेणाऱ्यांवर फडणवीस भडकले

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss