spot_img
Wednesday, February 19, 2025

Latest Posts

दंडासहित वसूल करण्यात येण्याच्या भीतीने लाडक्या बहिणीने पडताळणीपूर्वीच माघार

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना विधानसभा निवडणुकीमध्ये महत्वाची ठरली. लाडकी बहीण योजने बाबत नवीन नवीन माहिती समोर येत आहे. आता लाडकी बहीण योजनेच्या निकषांमध्ये न बसणाऱ्या महिला स्वतःहून पुढे येत आहेत. राज्यभरातून आतापर्यंत अनेक लाभार्थी महिलांनी स्वतःहून या योजनेचे पैसे परत करण्यास सुरवात केली असल्याची माहिती महिला व बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांनी दिली आहे. मात्र दिलेले पैसे परत घेण्याचा सरकारचा कोणताही विचार नसला तरी यापुढच्या काळात निकषात बसणाऱ्या महिलांनाच या योजनेचा लाभ मिळावा यासाठी सरकार उपाययोजना करणार असल्याचेही त्यांनी आदिती तटकरे यांनी सांगितले आहे. तर महिलांना ‘लाडकी बहीण’ योजनेतून वगळण्यासाठीची पडताळणी मोहीम राबवण्याच्या आधीच राज्यभरातून चार हजारांहून अधिक महिलांनी ‘योजना नको’ असा अर्ज केला आहे, अशी माहिती समोर आली आहे.

 

राज्य सरकारने ‘लाडकी बहीण’ योजनेची घोषणा केल्यानंतर महिलांचे अर्ज भरून घेतले. त्या वेळी पात्रता निकषात बसत नसलेल्या महिलांकडूनही अर्ज भरून घेण्यात आले होते. शासनानेही निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पडताळणी न करता सरसकट अर्ज भरून लाभ दिले. मात्र, आता पडताळणीनंतर तीन ते चार लाख महिला योजनेतून अपात्र ठरतील, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

दंडासहित वसूल करण्यात येण्याच्या भीती
राज्यभरातून लाडकी बहीण योजनेतील अनेक महिलांनी पैसे नको म्हणून अर्ज माघारी घेतले आहेत. सरकारच्या पडताळणीत अपात्र ठरण्याची टांगती तलवार आणि आतापर्यंत मिळालेले पैसे परत करावे लागण्याची भीती यामुळेच अनेक महिला आतापासूनच लेखी अर्ज देऊन ‘लाडकी बहीण’ योजनेतून बाहेर पडत आहेत, पडताळणीत अपात्र ठरल्यास मिळवलेल्या लाभाची रक्कम दंडासहित वसूल करण्यात येण्याच्या भीतीने ही ‘अर्ज माघार’ घेणे सुरू असल्याचे दिसून येत आहे. छत्रपती संभाजीनगर विभागातून अनेक महिलांनी अर्ज मागे घेतल्याची माहिती समोर आली आहे.

लाभ थांबवण्याची विनंती करणारे अर्ज
स्थानिक पातळीवरील शासकीय कार्यालयात योजनेचे लाभ थांबवण्याची विनंती करणारे अर्ज येत आहेत, अशी माहिती आहे. राज्यातून दोन कोटी 63 लाख महिलांनी या योजनेसाठी अर्ज केले. दोन कोटी 47लाख महिला पात्र ठरल्या आहेत. त्यातील दोन कोटी 34 लाख बहिणींना विधानसभा निवडणुकी अगोदर पाच महिने दरमहा दीड हजार रुपये देण्यात आले होते. पडताळणीनंतर तीन ते चार लाख महिला योजनेतून अपात्र ठरतील, असा अंदाज वर्तवला जात आहे.

शासनाने पोर्टल पुन्हा केले खुले
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अपात्र असतानाही अर्ज केलेल्या महिलांसाठी शासनाने पोर्टल पुन्हा खुले केले असून, त्यावर लाभ बंद करण्याचा अर्ज करण्याचा पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आहे. राज्य सरकारला दरमहा राज्यातील लाडक्या बहिणींसाठी तीन हजार 750 कोटी रुपये द्यावे लागतात.

या योजनेचे पोर्टल पुन्हा एकदा खुले करून देण्यात आले आहे, त्यावर 1 ते 15 ऑक्टोबरपर्यंत प्राप्त अर्जाची पडताळणी करून त्याला मंजुरी देणे, ज्यांनी लाभ नको म्हणून अर्ज केले, त्यांच्या अर्जाची पडताळणी करून त्यावर निर्णय घेणे अशा सूचनांचा त्यात समावेश करण्यात आला आहे. ज्यांना लाभ नको आहे, त्या लाडक्या बहिणींना तालुका आणि जिल्हा पातळीवरील महिला व बालकल्याण अधिकारी आणि जिल्हा महिला बालविकास अधिकारी कार्यालय, या ठिकाणीही लेखी अर्ज करता येणार आहे.

लाडक्या बहिणीचे पैसे परत घेतले जाणार का?
चुकीच्या पद्धतीने ज्यांनी अर्ज भरले त्यांनी स्वतःहून पैसे नको म्हणून अर्ज केले आहेत. सरकार कुणाचेही पैसे माघारी घेणार नाही तसा सरकारचा कोणताही विचार नाही. ज्या महिलांनी चुकीच्या पद्धतीने अर्ज भरले ते अपात्र होतील. त्यांना या पुढील हफ्ते मिळणार नाहीत. जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात योजनेचा हफ्ता दिला जाईल. त्यावेळी लाभार्थ्यांची संख्या पूर्वीच्या तुलनेत कमी असणार आहे. सध्या कोणतेही नवीन निकष नाहीत, असं आदिती तटकरे यांनी स्पष्ट केलं आहे.

योजनेचा 7 वा हप्ता कधी मिळणार?
लाडकी बहीण योजनेच्या सहा हप्त्यांची रक्कम योजनेत पात्र महिलांच्या खात्यावर पाठवण्यात आलेली आहे. डिसेंबर महिन्यात 2 कोटी 52 लाख लाडक्या बहिणींना योजनेची रक्कम 1500 रुपयांप्रमाणं 25 डिसेंबर ते 30 डिसेंबर दरम्यान देण्यात आली होती. महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी 26 जानेवारीच्या अगोदरपासून जानेवारीच्या लाभाच्या वितरणाची सुरुवात करण्यात येणार असल्याचं म्हटलं आहे.

हे ही वाचा : 

नागरिकांना शासकीय सेवा मोबाईलच्या माध्यमातून उपलब्ध करून द्या – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

सहाय्य्क प्राध्यापकाच्या ५०० हुन अधिक जागांची भरती; जाणून घ्या सविस्तर माहिती

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा .

Latest Posts

Don't Miss